दीपिकाला 'त्याची'च नशा

फोटोसह दिली माहिती 

Updated: Nov 19, 2019, 03:42 PM IST
दीपिकाला 'त्याची'च नशा
संग्रहित छायाचित्र

मुंबई : व्यसन, नशा हे अमुक एका व्यक्तीला अनेकदा वाईट सवयींच्या वाटेवर नेणारे घटक ठरतात. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिलासुद्धा अशाच एका गोष्टीची नशा आहे. ज्याविषयी तिने सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे. बी- टाऊनच्या या सौंदर्यवतीने नेमक्या कोणत्या नशाविषयी पोस्ट केली आहे, या प्रश्नाने तुमच्याही भुवया उंचावल्या ना? 

दीपिकाला नशा आहे, ती म्हणजे तिच्या पतीचा म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग याची. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या सेलिब्रिटी जोडीचा हटके अंदाज पुन्हा एकदा तिच्या या पोस्टमुळे सर्वांसमोर आला. 

सोशल मीडियावर दीपिकाने रणवीरचा एक फोटो पोस्ट केला आहे, या फोटोमध्ये रणवीर पाठमोरा असल्याचं दिसत आहे. त्याच्या टी-शर्टवर 'लव्ह इज अ सुपर पॉवर' Love is a super power असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिल्याचं दिसत आहेत. त्याचा असाच फोटो पोस्ट करत, ज्याप्रमाणे प्रेम सर्वाधिक ताकद आहे, त्याचप्रमाणेच तुसूद्धा आहेस... असं दीपिकाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 

'& you...my super drug!' असं कॅप्शन देत कायमच आपल्या पत्नीच्या पोस्टवर दिलखुलास कमेंट करणाऱ्या रणवीरप्रती त्याच्या पत्नीचा म्हणजेच दीपिकाचा हटके अंदाज पाहायला मिळाला. तिचं हे कॅप्शन वाचल्यानंतर लगेचच कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 

 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि रणवीर या बॉलिवूडच्या स्टार जोडीने त्यांच्या वैवाहिक जीवनाला एक वर्ष पूर्ण केलं. त्या निमित्ताने ही सुपरस्टार जोडी तिरुपती आणि सुवर्ण मंदिर अशा देवस्थळांच्या भेटीला गेली होती. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काही खास क्षण व्यतीत केल्यानंतर आता त्या दोघांनीही आपला मोर्चा पुन्हा एकदा कामाकडे वळवला आहे.