मुंबई : दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 26 सप्टेंबर 2022 रोजी रात्री उशिरा अभिनेत्रीने अस्वस्थतेची तक्रार केली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. मात्र या सगळ्या दरम्यान आता अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी आता एक गुडन्यूज समोर येत.  अभिनेत्रीची तब्येत आता बरी आहे.  नुकताच समोर आलेला व्हिडिओ याचा पुरावा देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पदुकोण विमानतळाच्या आत एन्ट्री घेताना दिसली
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी नुकताच दीपिका पदुकोणचा एक स्पॉट केलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका एकदम छान दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री कारमधून उतरत आहे आणि एअरपोर्टमध्ये एंट्री घेण्यासाठी जात आहे. यावेळी तिने मास्क काढून स्माईल देताना दिसत आहे.


रणवीर आणि दीपिका लवकरच एका नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत
दीपिका पदुकोणच्या लुकबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने काळ्या रंगाचा हाय-नेक टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. याशिवाय दीपिकाने वर काळ्या आणि पांढर्‍या लाईन असलेली जर्सीही कॅरी केली आहे. एकूणच अभिनेत्रीने बूट घालून हा लुक पूर्ण केला आहे. रणवीर आणि दीपिका लवकरच एका नवीन प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रणवीरने स्वत: मीडियाशी संवाद साधत त्याच्या चाहत्यांना हे सरप्राईज दिलं आहे. मात्र, दोघं कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत, याचा खुलासा अभिनेत्याने केलेला नाही.