मुंबई : अभिनेत्री बऱ्याचदा हटके स्टाईल करण्य़ाच्या नादात ट्रोल होतात. किंवा त्यांनी केलेली स्टाईल ही त्यांना महागात पडते. त्यामुळे त्या चर्चेत येतात. तर कधी अभिनेत्री एवढा टाईट ड्रेस घालतात की, त्यांना पाहून अनेकांना प्रश्न पडतो की त्या श्वास कशा घेऊ शकत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच काहीशी चर्चा सध्या दीपिका पादुकोणबाबत होत आहे. अत्यंत घट्ट ब्लॅक कलरचा ड्रेस घालून ती कॅमेऱ्यासमोर आली. हा ड्रेस इतका टाईट होता की तो पाहून दीपिकाला नीट चालायला ही जमत नसल्याचं दिसून आलं, तिला नीट चालता तरी येत आहे का असा प्रश्न तिने असलेल्या सगळ्यांनाच पडला होता.


हा टाइट ड्रेस परिधान करून दीपिका पादुकोण कॅमेऱ्यासमोर येताच सर्वांच्या नजरा तिच्या ड्रेसवर खिळल्या.


विशेष म्हणजे दीपिकाच्या या ब्लॅक कलरच्या ड्रेसला वरपासून खालपर्यंत घट्ट करण्यासाठी स्ट्रिंग क्रॉस करण्यात आली होती. हा लूक पूर्ण करण्यासाठी दीपिकाने मोठे कानातले घातले होते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


दीपिका पादुकोणचा हा ड्रेस इतका फिट होता की तिचं फिगर यावेळी स्पष्ट दिसत होतं. हा ड्रेस पाहून अनेकांना असे वाटत होते की, अभिनेत्री इतका टाइट ड्रेस घालून कशी चालत आहे.


या स्टाईलवरुन काहींनी दीपिकाला ट्रोल केलं आहे. तर काहीजण तिच्या स्टाईलच्या प्रेमात पडले आहेत.