Deepika Padukone  : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची जोडी ही चांगलीच चर्चेत असते. सध्या त्यांच्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्यांच्या मुलीचा जन्म आहे. गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी दीपिकानं त्यांच्या मुलीला जन्म दिला. तिनं 8 सप्टेंबर 2024 रोजी मुलीला जन्म दिला आहे. तेव्हापासून सगळेच त्यांना शुभेच्छा देत आहेत. तर त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी अंबानी कुटुंबापासून शाहरुख खानपर्यंत सगळेच भेटायला आले होते. या सगळ्यात अशी माहिती समोर येत आहे की रणवीर आणि दीपिका हे पेरेटिंगसाठी रणबीर कपूर आणि आलियाची पेरेंटिंग स्टाईल फॉलो करू शकतात. त्या दोघांनाही ती पद्धत आवडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, एका रिपोर्टनुसार, दीपिका ही आलिया भट्ट, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या रायची पेरेंटिंग स्टाईल फॉलो करू शकते. खरंतर बॉलिवूड लाइफच्या एका रिपोर्टनुसार, एका सुत्रानं सांगितलं की दीपिका पदुकोण तिच्या लाडक्या लेकीचा सांभाळ करण्यासाठी ऐश्वर्या रायला फॉलो करू शकते. ते कसं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ऐश्वर्या रायनं आराध्याला सांभाळण्यासाठी नॅनी ठेवली नव्हती, तर तिनं स्वत: आराध्याचं संगोपन केलं. इतकंच नाही तर जया बच्चन यांनी देखील ऐश्वर्याला 'हॅन्ड्स-ऑन-मॉम' चा टॅग दिला. खरंतर, दीपिका देखील तिच्या मुलीसाठी देखील असचं करणार आहे.



फक्त ऐश्वर्या राय बच्चन नाही तर आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा देखील पेरेंटिंग स्टाइलला फॉलो करतात. रिपोर्ट्सनुसार सुत्रांनी सांगितलं की अनुष्काप्रमाणे दीपिका आणि रणवीर देखील त्यांच्या मुलीला मीडियापासून लांब ठेवणार आहेत. रिपोर्टमध्ये हे देखील सांगितलं की दीपका ही आलियाप्रमाणे करू शकते आणि ती थोडी मोठी झाल्यानंतरच आलियाप्रमाणे तिही तिच्या मुलीचा चेहरा दाखवणार. 


हेही वाचा : 'मी त्याला गर्दीतून बाहेर काढलं आणि...', भर कार्यक्रमात चुकीचा स्पर्श करणाऱ्या पुरुषाला ईशा देओलनं असा शिकवला धडा


रणवीर आणि दीपिकानं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलीचा जन्म झाल्याचे सांगितले. त्यासोबत त्यांनी बाळाचं इलस्ट्रेशन होतं आणि त्यासोबत असं लिहिलं की तुमचं स्वागत आहे! 8.09.2024 दीपिका आणि रणवीर. तर रणवीरनं अनेकदा सांगितलं आहे की त्याच्या आजुबाजूला असलेली फीमेल एनर्जी त्याला प्रचंड आवडली. त्यानं यावेळी हे देखील सांगितलं की त्याला मुलगी झाली पाहिजे. आता म्हणता येईल की त्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.