Deol Family's Women Can Not Work in Industry : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील काही असे घराणे आहेत ज्यांच्यात आधी महिलांना अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यास परवानगी नाही. त्यापैकी एका घराण्याविषयी आपल्याला माहित आहे आणि ते म्हणजे कपूर घराणं. कधी काळी कपूर कुटुंबातील महिलांना अभिनय क्षेत्रात काम करण्यास परवानगी नव्हती. जर कोणती अभिनेत्री त्यांच्या घरी सून म्हणून आली तर त्या अभिनय क्षेत्रापासून दूर राहायच्या. त्यानंतर त्यांच्या घरातून जर कोणी हे मोडलं तर ते अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूरनं. त्यानंतर त्यांच्या घरातील महिला या अभिनय क्षेत्रात काम करु लागल्या. मात्र, ही होऊन गेलयं आजही एक कुटुंब आहे ज्यात महिलांना अभिनय क्षेत्रात कार्यरत राहण्यास परवानगी नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते कोणतं घराणं आहे.  तर हे देओल घराणं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देओल कुटुंबातील एकाही महिलेला चित्रपटसृष्टीत कोणी पाहिलं नाही. धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल हे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. आता त्यांच्या कुटुंबातून हेमा मालिनी, ईशा आणि आहाना यांना सोडून चित्रपटसृष्टीत त्यांच्या घरातील कोणतीही महिला ही दिसली नाही. आता त्यांचा पुतण्या अभय देओलनं 'फिल्मफेयर' ला दिलेल्या मुलाखतीत देओल कुटुंबातील मुली आणि सुनांना चित्रपटसृष्टीत काम करण्यास न करण्यावर वक्तव्य केलं. त्यानं यावेळी हे देखील मान्य केलं की जुनाट विचारांचे आहेत. 


अभय देओलनं सांगितलं की 'लहाणाचे मोठे होत असताना आम्ही जुन्या विचारांचे होतो. त्यात आमचं एकत्र कुटुंब होतं आणि त्यात आम्ही सात मुलं होतो. चित्रपट अशी गोष्ट आहे ज्याविषयी मला लहानपणापासूनच माहित होतं. माझा काका आणि माझे वडील चित्रपटांमध्ये होते. त्यांचं हे सर्वसामान्य कुटुंबातून आले होते. ते एका गावात राहणारे आहेत आणि त्यांच्यासाठी हे मोठं शहर आणि ग्लॅमरचं जग थोडं वेगळं होतं.'


अभय देओलनं पुढे सांगितलं, 'त्यांना त्यांच्या छोट्या गावातील मूल्य तसेच ठेवायचे होते. आम्हाला कोणत्याही फिल्मी पार्ट्यांमध्ये जाण्यापासून का थांबवलं जातं हे मला कळायचं नाही. ते इंडस्ट्रीच्या दुसऱ्या मुलांशी आम्हाला मिक्स होऊ देत नव्हते. ते आम्हाला या सगळ्यापासून दूर ठेवत आम्हाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते, पण तेव्हा मला काही कळायचं नाही.'


हेही वाचा : 'सूर्यवंशम'मधील गौरी काय करते माहितीये? बिग बींसोबत कधी केला रोमांस; दोनवेळा मोडलं लग्न


पुढे घरातील महिलांविषयी बोलताना सांगितलं की 'त्यांना काम करण्याची परवानगी आहे. पण चित्रपटांमध्ये नाही. त्याविषयी बोलायचं झालं तर सनी देओलची पत्नी लिंडा, बॉबीची पत्नी तान्या आणि धर्मेंद्र यांची पहिली पत्नी आणि दोन्ही मुली देखील चित्रपटसृष्टीपासून लांब राहिल्या आहेत.'