`लग्न एकाशी आणि रोमान्स दुसऱ्याशी...`, विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्समुळे Devoleena Bhattacharjee ट्रोल
Devoleena Bhattacharjee चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्स केल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
Devoleena Bhattacharjee Got Trolled : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya) मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकली. देवोलीनाच्या मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. तिच्या लग्नानंतर सगळ्यांना धक्का बसला होता. मात्र, लग्नानंतर देवोलीनाचा एक व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. या व्हिडीओत देवोलीना डान्स करताना दिसत आहे.
देवोलीनानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओत देवोलीना सध्या सोशल मीडियावर ट्रेन्ड होत असलेल्या 'पठाण' (Pathan) चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) या ट्रेंडिग गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मात्र, यावेळी देवोलीनानं पती शहनवाजसोबत नाही तर तिचा सहकलाकार विशाल सिंगसोबत (Vishal Singh) डान्स केला आहे. विशालसोबत केलेल्या या रोमॅंटिक डान्स व्हिडीओमुळे देवोलीना नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.
देवोलीनाच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तिला विशालसोबत डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, लग्न एकाशी केलं आणि रोमान्स दुसऱ्याशी. दुसरा नेटकरी म्हणाला, लग्न फक्त हे प्रसिद्धीसाठी केलं होतं. तिसरा नेटकरी म्हणाला, लग्न ट्रेनरशी केलं आणि ट्रेनिंग दुसऱ्यासोबत करते. आणखी एक नेटकरी म्हणाला, विशालशीच लग्न केलं असतं, साध्याभोळ्या माणसाला फसवण्याची काय गरज.
दरम्यान, या आधी देवोलीना आणि विशालनं त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र, त्यावेळी त्यांचे लग्न झाले नव्हते तर त्यांचे एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार होतं. देवोलीना आणि विशालमध्ये असलेली जवळीकता पाहता ते दोघे मित्र नाहीत असे नेहमी अनेकांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर ते दोघं रिलेशनशिपमध्ये असून ते फक्त जगापासून या विषयी लपवत आहेत.
हेही वाचा : Photo : 'या' अभिनेत्रीला विसरलं बॉलिवूड, तर चर्चेत राहण्यासाठी करू लागली बोल्ड फोटोशूट
या सगळ्यात जेव्हा देवोलीनानं शहनवाजशी लग्न केलं तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झालं. तिनं अचानक लग्न केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्या लग्नाची तयारी सुरु असताना काही लोकांना वाटले की हा प्रॅंक आहे. तर काहींना वाटलं की 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील तिचा सहकलाकार विशाल सिंगसोबत लग्न बंधनात अडकणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, देवोलिना 2019 शाहनवाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
देवोलीनानं या 'साथ निभाना साथीया' मालिकेत गोपीची भूमिका साकारली होती. नंतर, अभिनेत्रीनं 'लाल इश्क' सारख्या शो आणि 'साथ निभाना साथिया'च्या दुसऱ्या सीझनमध्ये काम केले. देवोलीना 2019 मध्ये प्रसारित झालेल्या 'बिग बॉस 13' चा देखील एक भाग होती. देवोलिना सगळ्यात शेवटची 'बिग बॉस 15' मध्ये दिसली होती.