Devoleena Bhattacharjee's Got Troll Over Her Marriage : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya)  मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ने मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. तिच्या लग्नानंतर सगळ्यांना धक्का बसला होता. तिच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. मात्र, काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत आफताबची आठवण करून दिली. आता या ट्रोलर्सना देवोलीनानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिना खानच्या मॅनेजरच्या लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत हिनानं नवरदेवाचे बूट चोरल्यानंतर जी रक्कम मागितली ती ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. यावेळी एक-दोन हजार नाही तर तब्बल 1 लाख 11 हजार रुपयांची मागणी केली आहे. तिने स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केलं असून ती सगळ्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते तिच्या लूकचे कौतुक करताना थकले नाहीत, मात्र साडीमध्ये तिचा किलर लूक पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर हिना खानने लूकसोबत सुंदर अशी हेअर स्टाईल केली आहे. तिना न्यूड मेकअप अतिशय सुंदर दिसत आहे.



नेटकऱ्यांनी केलेल्या या कमेंट पाहता देवोलीनानं त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. अरे नाही तर तुम्हालाच तुमची होणारी पत्नी आणि मुलगा मिळून फ्रीजमध्ये फीट करायला नको. मला खात्री आहे की ही बातमी तुमच्या लक्षात असेल कारण फार जुनी नाही, पण तरीही तुम्हाला शुभेच्छा.



देवोलीनानं आत्तापर्यंत कोणाला तिच्या रिलेशनशिपविषयी कळू दिले नव्हते. तिनं अचानक लग्न केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्या लग्नाची तयारी सुरु असताना काही लोकांना वाटले की हा प्रॅंक आहे. तर काहींना वाटलं की साथ निभाना साथिया या मालिकेतील तिचा सहकलाकार विशाल सिंगसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. मात्र, जेव्हा देवोलीनानं लग्नानंतर तिचे शहनवाजसोबत फोटो शेअर केले होते. तर सगळ्यांना आश्चर्य झाले. रिपोर्ट्सनुसार, देवोलिना 2019  शाहनवाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. (Devoleena Bhattacharjee s Got Troll Over Her Marriage with shahnawaz sheikh netizens compare them with shraddha walker aaftab poonawala) 


हेही वाचा : KIFF Video: बडे दिल वाला! शाहरूखने सेकंदाच जिंकलं मन, अमिताभ बच्चन दिसताच केलं असं काही की...


दरम्यान, या आधी देवोलीना आणि विशालनं त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र, त्यावेळी त्यांचे लग्न झाले नव्हते तर त्यांचे एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार होतं. देवोलीना आणि विशालमध्ये असलेली जवळीकता पाहता ते दोघे मित्र नाहीत असे नेहमी अनेकांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर ते दोघं रिलेशनशिपमध्ये असून ते फक्त जगापासून या विषयी लपवत आहेत असे नेटकऱ्यांना वाटायचे.