Devoleena Bhattacharjee पती शाहनवाजला म्हणाली खरा भारतीय मुस्लीम, लव्ह जिहादवर सडेतोड उत्तर
Devoleena Bhattacharjee : देवोलिना भट्टाचार्जीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिच्या सडेतोड उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं असून अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. खरंतर हा वाद `द केरला स्टोरी` हा चित्रपट पाहण्यावरून सुरु झाला होता.
Devoleena Bhattacharjee : छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणून ओळख असणारी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी देवोलीनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या पतीसोबत तिनं 'द केरला स्टोरी' पाहिला हे सांगितलं. देवोलीनाचा पती हा मुस्लीम असून त्याचं नाव शाहनवाज शेख असे आहे. द केरला स्टोरी प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी त्यांना आलेला एक्सपिरियन्स सांगताना दिसले. तर एका नेटकऱ्यांनं तिच्या लग्नाला लव्ह जिहादशी जोडले. आता देवोलिनानं या प्रकरणावर वक्तव्य केलं असून तिनं तिच्या पतीला खरा भारतीय मुसलमान म्हटलं आहे.
खरंतर हा वाद कधी सुरु झाला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. राइट-विंग लीडर प्राचीनं हरिद्वार, उत्तराखंडमध्ये द केरला स्टोरीच्या स्क्रीनिंगचे फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिले की हरिद्वारमध्ये मुलींना द केरला स्टोरी फ्रीमध्ये दाखवण्यात आली. या पोस्टवर कमेंट करत एका नेटकऱ्यांनी देवोलिनाचा उल्लेख करत तिच्या पतीचे देखील नाव घेतले. तर त्या नेटकऱ्यांनं उत्तर देत म्हटलं की लव्ह जिहाद असचं असते.
यावर रिप्लाय करत देवोलीना ट्वीट करत म्हणाली, 'अरे खान साहेब, मला बोलवण्याची काही आवश्यकता नाही. मी आणि माझ्या पतीनं द केरला स्टोरी आधीच पाहिला होतो आणि आम्हाला दोघांना हा चित्रपट खूप आवडला. तुम्ही खरे भारतीय मुस्लीम हे नाव ऐकले आहे का? माझा पती त्यांच्यातलाच एक आहे. जे चुकीचं आहे ते आहे आणि जे चुकीचं नाही ते नाही, बोलण्याची हिंम्मत त्याच्यात आहे. देवोलिनाचीही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
याआधी देवोलीनानं एक पोस्ट करत तिनं द केरला स्टोरी पाहिला आणि त्यावेळी तिच्या पतीची प्रतिक्रिया कशी होती हे सांगितलं. 'माझे पती मुस्लीम आहेत आणि माझ्यासोबत चित्रपट पाहायला आले आणि त्यांनी त्याचे कौतुक केले. त्याने तो गुन्हा म्हणून घेतला नाही किंवा तो आपल्या धर्माविरुद्ध आहे असे म्हटला नाही. मला वाटतं प्रत्येक भारतीय असा असावा..'
हेही वाचा : 'सासऱ्यांनी सुनेहून चांगलं जमलंय', Aishwarya च्या Cannes Look ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
देवोलिना भट्टाचार्जीने गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये शाहनवाज शेखशी विवाह केला. देवोलिनाचा पती शाहनवाज हा आधी तिचा जीम ट्रेनर होता. 2012-17 या काळात देवोलिना 'साथ निभाना साथिया'मध्ये गोपी बहूची भूमिका साकारली होती.