'सासऱ्यांनी सुनेहून चांगलं जमलंय', Aishwarya च्या Cannes Look ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Aishwarya Rai Bachchan and Amitabh Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनचा कान्समधील लूक चांगलाच चर्चेत आहे. अशात अनेकांनी तिचा हा लूक पाहून तिला ट्रोल केले. मात्र, त्यानंतर नेटकऱ्यांनी अमिताभ यांचा एक जुना फोटो शेअर करत तिला  अमिताभ यांना कॉपी केल्याचे म्हटले आहे.

दिक्षा पाटील | Updated: May 20, 2023, 11:16 AM IST
'सासऱ्यांनी सुनेहून चांगलं जमलंय', Aishwarya च्या Cannes Look ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya Rai Bachchan and Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या तिच्या कान्सच्या ड्रेसनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. तिचा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं अनेकांनी तिला ट्रोल केलं तर काहींनी तिच्या या लूकची स्तुती केली आहे. ऐश्वर्याचा हा लूक 18 मे रोजी पाहायला मिळाला आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याचा हा लूक चर्चेच होता. पण आता अमिताभ बच्चन यांचा ऐश्वर्या सारखा एक लूक चर्चेत आला आहे. त्यांचा एक जूना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अमिताभ यांचा लूक ऐश्वर्या पेक्षा चांगला आहे असं म्हटलं आहे. 

ऐश्वर्यानं तिचा लूक चर्चेत रहावा यासाठी प्रयत्न केले पण तसं न होता ती ट्रोल झाली. काहींनी तिचा ड्रेस हा फॉइल पेपर पासून बनवला की काय असं म्हटलं तर काही लोकांनी ऐश्वर्याला एकच हेअर स्टाईल नेहमी केल्यामुळे ट्रोल केले. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट केल्या की ऐश्वर्यानं तिचे सासरे अमिताभ बच्चन यांना कॉपी केले आहे. अमिताभ यांचा एक जुना फनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऐश्वर्याच्या लूकविषयी बोलायचे झाले तर तिनं एल्यूमीनियम आणि शिमरी वर्क असलेला हुडेड गाउन परिधान केला आहे. तिच्या या ड्रेसमध्ये डोक्यापासून कंबरेपर्यंत हे एक मोठं हूड आहे. तिच्या कमरेला एका बोच्या मदतीनं हे हूड परिधान केलं आहे. ऐश्वर्याच्या मेकअप विषयी बोलायचे झाले तर तिनं तिची नेहमीची हेअर स्टाईल मधला भांग आणि मोकळे सोडलेले केस अशी ठेवले आहेत. 

Aishwarya Rai Bachchan s look from Cannes 2023 got compared with Amitabh Bachchan s

ऐश्वर्या आणि अमिताभ यांचे हे फोटो शेअर करत एक नेटकरी म्हणाला, ठीक आहे, पण सासऱ्यांनी सुनेपेक्षा चांगल केलं. दुसरा नेटकरी म्हणाला, मला यावर पूर्ण भरोसा आहे की सासऱ्यांचा हा फोटो पाहिल्यानंतर ऐश्वर्या प्रेरित झाली असेल. तिसरा नेटकरी म्हणाला, प्रत्येक मास्टर पीसची एक फेक कॉपी असते. आणखी एक नेटकरी म्हणाला, की नक्की तिचा ड्रेस कशापासून बनवलेला आहे. 

Aishwarya Rai Bachchan s look from Cannes 2023 got compared with Amitabh Bachchan s

हेही वाचा : 'परवा रात्री माझ्यावर चार गुंडांनी...', Sankarshan Karhade नं पोस्ट शेअर करत सांगितली आपबिती

Cannes 2023 च्या रेड कार्पेट इवेंटमध्ये ऐश्वर्या इंडियाना जोनस अॅन्ड डायल ऑफ डेस्टिनी प्रीमियरसाठी पोहोचली होती. यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये अनेक युट्यूबर्सनं हजेरी लावली होती. त्यात हरियानवी डान्सर सपना चौधरीनं देखील हजेरी लावली होती.