मुंबई : दिलीप प्रभावळकर यांचा मराठीतला 'पोस्टर बॉईज' तुम्ही पाहिलाच असेल... हा 'नसबंदी'च्या विषयावरच एक मराठी कॉमेडी चित्रपट होता... काहिशा सारख्याच धर्तीवर याच नावाचा एक हिंदी चित्रपट आता येतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी 'पोस्टर बॉईज'मध्ये सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. श्रेयसच्या मराठी 'पोस्टर बॉईज'चा हा रिमेक असणार आहे. या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला. 



यावेळी सिनेमाबद्दल बोलताना 'मराठीमध्ये हा सिनेमा बनला होता आणि चांगला चाललाही. आता हा त्यापेक्षाही मोठा सिनेमा असेल. हीमॅनच्या कुटुंबाचा हा नसबंदीवर आधारीत सिनेमा आहे. माझी नसबंदी तर निसर्गही करू शकला नाही... मी श्रेयसला सांगितलं होतं, एखादी चांगली गोष्ट घेऊन ये ज्यामध्ये नसबंदी किंवा दारुबंदी नसेल... काहीतरी असं ज्यामुळे त्रास होणार नाही' असं धर्मेंद्र यांनी यावेळी म्हटलंय.