Dipika Kakkar and Shoaib Ibrahim : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कड आणि तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम यांचा मुलाचा जन्म नुकताच झाला आहे. दीपिकानं प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिला आहे. आता ती रुग्णालयात असून तिचा एक फोटो शोएबनं शेअर केला होता. त्यावेळी दीपिका आता ठीक असल्याचे त्यानं सांगितले होते. दरम्यान, मुलाच्या जन्मानंतर दीपिरानं पहिल्यांदा व्लॉगमध्ये दिसली. इतकंच नाही तर तिच्या प्रसुतीची तारिख ही जुलैमध्ये असून मुलाचा लवकर झाला. यावेळी त्यांनी बाळ आता कसं आहे आणि त्याच्याविषयी अनेक गोष्टी सांगताना दिसले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात बाळाचा जन्म होईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण बाळाला मात्र, थांबायची इच्छा नव्हती. आता सगळं आधी पेक्षा चांगलं आहे. बाळाला अजूनही एनआईसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. दीपिकाला त्रास होतोय कारण तिचं सी-सेक्शन झालं आहे आणि तिला टाके आहेत. तर दीपिका आणि शोएब हे दोघे त्यांच्या बाळाला भेटायला जातात आणि त्याला फक्त हाथ लावून परत येतात. त्यांच्या व्यतिरिक्त कुटूंबातील एकही सदस्य बाळाला भेटला नाही. 


हेही वाचा : "त्यानं माझ्या प्रायव्हेट पार्टवर ठोसे मारले आणि...", Stree फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा



याविषयी सांगताना दीपिका म्हणाली की, "आता आधीपेक्षा ठीक आहे. त्रास होतोय पण हीलिंगचा जो काळ असतो तो 8 आठवड्यांचा आहे. ती दोनवेळा बाळाला पाहायला जाते आणि तेच तिच्यासाठी एनर्जी डोसप्रमाणे आहे." शोएबनं पुढे सांगितलं की "हा एक वेगळाच अनुभव असतो, पण त्याला असं पाहणं आवडतं नाही, तरी डॉक्टर म्हणतात की तुम्ही जा. एक दिवस तर मी 24 तास गेलोच नाही कारण माझी हिंम्मत होत नव्हती की मी जाऊन त्याला बघू. पण डॉक्टर म्हणाले जा त्याला हात लावा म्हणजे त्याला तुमचा स्पर्श कळेल."


दीपिका देखील आहे प्री-मॅच्युअर बेबी?


दीपिका याविषयी सांगताना म्हणाली की मी पण प्री-मॅच्युअर जन्माला आली होती. माझी आई म्हणाली की तो दीपिका सारखा झाला आहे. मी तर खूप जास्त अगोदर झाली होती. 7 व्या महिन्यात माझा जन्म झाला होता. रोज बाळाच्या आरोग्यात सुधारणा होत आहेत. हे पाहून आनंद होतो. जवळपास असलेल्या मुलांना पाहून पण आनंद होतो. तर मुलगा शोएबसारखा आहे. प्रसुतीआधी डॉक्टरांनी तिला विचारलं होतं की तुला काय वाटतं काय होईल, तेव्हा तिनं मुलगा होईल असं वाटतं असल्याचं सांगितलं. 5 मिनिटांत डॉक्टरांनी सांगितलं की मुलगा झाला आहे. त्यावेळी दीपिकाला खूप आनंद झाला. तिनं प्रसुतीच्या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेतला. 



दरम्यान, शोएबच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच त्यांच्या मुलांचा जन्म झाला. त्यानं सांगितलं की वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर सगळे लोक थांबले होते आणि बोलत होते. तेव्हाच रात्री तो दीपिकाला घेऊन रुग्णालयात गेला. शोएब पुढे म्हणाली, बाळासाठी तो 3-4 महिने कामावरून ब्रेक घेण्याचा विचार करत आहे. तर सध्या जुगनी या मालिकेत सध्या काम करत असलेल्या शोएबनं प्रोडक्शन हाउसशी या विषयी बोलला आणि कोणी त्याला काही म्हटलं नाही. प्रोडक्शन हाउसनं त्याला फार पाठिंबा दिला. असं कोणी दुसरं करत नाही. प्रोडक्शन हाउसनं त्याच्या कामाचे तास सुद्धा कमी केले. त्यासोबत सुट्ट्या देखील दिला. त्यासाठी त्यानं आभार मानले.