"त्यानं माझ्या प्रायव्हेट पार्टवर ठोसे मारले आणि...", Stree फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Flora Saini :  बॉलिवूड अभिनेत्री फ्लोरा सैनीनं आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. पण कोणला वाटल नसेल असा अनुभवत तिच्या आयुष्यातही आला होता. दरम्यान, फ्लोरानं एका मुलाखतीत तिच्या या लैंगिक छळाविषयी सांगितलं होतं. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 26, 2023, 02:44 PM IST
"त्यानं माझ्या प्रायव्हेट पार्टवर ठोसे मारले आणि...", Stree फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा  title=
(Photo Credit : Movie Still)

Flora Saini : बॉलिवूड कलाकार हे नेहमीच त्यांच्या कामा पेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. बऱ्याचवेळा कलाकार त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी स्पष्टपणे सगळ्यांसमोर शेअर करतात. तर काही कलाकार त्यांना करिअरच्या सुरुवातीला आलेले काही अनुभव सांगताना दिसतात. दरम्यान, स्त्री फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीनं एका तिला आलेला असा अनुभव सांगितला आहे. जे ऐकूण तुम्हालाही आश्चर्य वाटेल. फ्लोरानं एका मुलाखतीत तिच्या एब्यूसिव्ह रिलेशनशिपविषयी सांगितले आहे. वयाच्या 20 व्या वर्षी ती एका निर्मात्याच्या प्रेमात होती. त्यावेळी तो तिच्या चेहऱ्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर ठोसा मारायचा. 

फ्लोरा सैनीनं 2018 मध्ये तिच्या बॉयफ्रेंडवर मी टूचे आरोप केले होते. तर एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिचा बॉयफ्रेंड आणि चित्रपट निर्माता गौरांद दोषीसोबत राहण्यासाठी तिनं घर सोडलं होतं. सुरुवातीला तो खूप चांगलं वागायचा की तिला तिचे आई-वडील देखील मुर्ख वाटू लागले होते. फ्लोरा याविषयी सांगताना म्हणाली, "तुमच्या आई-वडिलांना हे चांगलं नाही असं लगेच कळतं. श्रद्धा केसमध्ये देखील असं झालं होतं. ते तुम्हाला तुमच्या कुटूंबापासून दूर करतात. मी सुद्धा माझं घर सोडलं आणि त्याच्या एका आठवड्यात त्यानं मला मारहाण करायला सुरुवात केली होती. मला कळतच नव्हतं की तो असं अचानक का करतोय. कारण माझ्यासाठी तो खरंच एक चांगला मुलगा होता."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फ्लोरा पुढे म्हणाली की, "एक दिवस रात्रीच्या वेळी त्यानं मला इतकं मारलं की माझा जबडा तोडला. एकदिवस त्यानं त्याच्या वडिलांच्या फोटोवर हात ठेवत सांगितलं की तो मला जिवंत ठेवणार नाही. तो जसाच ती फोटो फ्रेम ठेवण्यासाठी वळला तसेच लगेच माझ्या आईचे शब्द माझ्या कानावर येऊ लागले किंवा आठवू लागले की अशा परिस्थितीतून तू तिथून पळ. कपडे परिधान केले आहेस की नाही, पैसे आहेत की नाही याचा विचार न करता तिथून पळ. मी माझ्या घरी आली आणि परत कधीच गेली नाही." 

हेही वाचा : शाहरुखला मानधनाच्या बाबतीत Thalapathy Vijay नं टाकलं मागे, Leo साठी घेतलं इतकं मानधन

फ्लोरानं 'न्यूज 18' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की तिचा बॉयफ्रेंड हा एब्यूसिव्ह झाला होता. तो तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि चेहऱ्यावर ठोसे मारायचा. इतकंच काय तर तिला काम देखील करू देत नव्हता. याशिवाय तिला कोणाशीच बोलू देत नव्हता. त्यानं तिच्याकडून फोन काढून घेतला होता. तर आता फ्लोरा त्या रिलेशनशिपमध्ये नसून आनंदी आहे. त्यातून बाहेर आल्यानंतर फ्लोरा तिच्या आई-वडिलांसोबत पुन्हा राहू लागली. दरम्यान, फ्लोरा आणि गौरांग दोषी ही जवळपास 14 महिने रिलेशनशिपमध्ये होते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x