मुंबई : सोमवारी ६६ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 66th National Film Award सोहळा संपन्न झाला. यंदाही हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या President हस्ते न दिल्याने 'धुरळा' Dhurala सिनेमाचा दिग्दर्शक समीर विद्वांसने Director Sameer Vidwans राग व्यक्त केला आहे. या मानाच्या पुरस्कारासाठी राष्ट्रपतींनी वेळ न काढता उपराष्ट्रपती  व्यंकय्या नायडूच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. या संदर्भात संताप ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षीपासून हे काय नवीन सुरू झालंय?! ‘राष्ट्रपती’ पदक द्यायला सन्मा. राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाहीत?! मान्य आहे की आपल्या देशात राष्ट्रपती खूऽऽऽप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, ह्याआधीचे सर्व काढतच होते की वेळ! त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजीत होतं ना! असा संताप समीर विद्वांसने व्यक्त केला आहे. (...म्हणून २९ डिसेंबरला बिग बींना दादासाहेब फाळके पुरस्कार होणार प्रदान)


 



गेल्या वर्षापासून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण हे राष्ट्रपतींऐवजी इतरांच्या हस्ते देण्यात येत आहेत. ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. मात्र, पुरस्कार वितरणाआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्याचं कळताच काही कलाकारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.(#66thNationalFilmAwards : 'नाळ'च्या श्रीनिवाससह अन्य कलाकारांचाही गौरव) 



उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. परंतु या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मात्र उपस्थित नव्हते. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार होते. पण त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहता आले नाही.