मुंबई : दिशा पटानी बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा फक्त तिच्या यशस्वी सिनेमांसाठीच नाही तर तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील लोकप्रिय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिशा बिकिनीतील फोटो शेअर करत आहे. आता 2018 हे वर्ष सरताना आणि 2019 च्या पूर्वसंध्येला दिशाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. 2018 चा आजचा शेवटचा दिवस या दिवशी पुन्हा एकदा सफेद रंगाच्या बिकीनीतील आपला हॉट फोटो दिशाने शेअर केला आहे. या फोटोतून तिने आपला न्यू इअर प्लान शेअर केला आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोत एका जेट स्कीवर ऑफ वाइट रंगाची बिकीनी घालून बसली आहे. या बिकिनीमध्ये दिशा फिट आणि हॉट दिसत आहे. 
 



या फोटोसोबत तिने लिहिलं आहे की, Eat sleep swim repeat .. म्हणजे यावरून तिचा 31 डिसेंबरचा प्लान आपल्या लक्षात येत आहे.  
 



दिशाचा या अगोदरचा सिनेमा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत हिट ठरला आहे. दिशा आता आपला आगामी सिनेमा 'भारत' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 
 



या सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ, तब्बू आणि सुनील ग्रोवर महत्वाच्या भूमिकेत आहेत.