Allu Arjun : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचे लाखो चाहते आहेत. त्याचे सगळे चाहते हे त्याच्या आगामी 'पुष्पा 2' या चित्रपटासाठी फार उस्तुक आहेत. या सगळ्यात अल्लू अर्जुनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये दावा करण्यात येत आहे की अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्या मागचं सत्य काय आहे ते समोर आलं आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय प्रकरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्लू अर्जुनचे दोन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल होत असलेल्या फोटोत अल्लू अर्जुन एका व्यक्तीशी हात मिळवताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत अल्लू अर्जुन एका रजिस्टरवर सही करताना दिसत आहे. त्यानं असं का केलं किंवा अल्लू अर्जुनला अटक झाली का अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. दरम्यान, त्याचं सत्य आता समोर आलं आहे. त्यामुळे इंटरनेटवर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली होती. आता चाहते घाबरले असताना, त्याचं सत्य कारण समोर आलं आहे. 



सोशल मीडियावर अल्लू अर्जुनच्या फॅन पेजनुसार, अल्लू अर्जुन हा आरटीओ ऑफिसला गेला होता. हे आरटीओ ऑफिस खैरताबादमध्ये आहे. तर अल्लू अर्जुन काही दिवसात 'पुष्पा 2 : द रूल' या चित्रपटासाठी इंटरनॅशनल लोकेशनवर शूटिंग करणार आहेत. त्यासाठी तो इंटरनॅशनल लायसेंस घेणार आहे. रिपोर्टमध्ये हा देखील दावा करण्यात आला की चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी खूप भयानक किंवा खतरनाक असे धमाकेदार सीन शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅक्शन स्टंट करण्यासाठी अभिनेत्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसेंस असणं गरजेचं आहे. त्यासाठीच अल्लू अर्जुन हा आरटीओ ऑफिसला पोहोचला होता. 


अल्लू अर्जुननं काही दिवसांपूर्वी त्याच्या चाहत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. ज्यात अल्लू अर्जुनला अनेकांनी फुलांचे हार घातल्याचे दिसत होते. इतकंच नाही तर त्याच्यावर फुलांचा पाऊस करण्यात आला होता. 'पुष्पा 2' च्या शूटिंगच्या दरम्यान, अल्लू अर्जुन आणि सुकुमार विजागमध्ये उपस्थित होते. या सगळ्यात समोर आलेल्या माहितीनुसार, जान्हवी कपूरला एका हटके भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं आहे. खरंतर, अजून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


हेही वाचा : तिकिट मिळालं पण...! उर्वशी रौतेला करणार राजकारणात पदार्पण?


 'पुष्पा 2 : द रूल' विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर फहाद फासिस खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. असं म्हटलं जातं की या चित्रपटाचं बजेट हे 500 कोटी आहे.