टेस्ट भी, हेल्थ भी... जेवणाच्या ताटात लोणचं का असलंच पाहिजे?

health benefits of achaar : तुम्हीही जेवणाच्या ताटातील लोणच्याला नेहमी दुर्लक्ष करत असाल. पण लोणच्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?

| May 12, 2024, 00:00 AM IST

Add achaar to your diet : भाजी अशीही झाली असो, लोणच्याची एक फोड ताटात दिसली की जेवणाला वेगळीच चव येते. जेवण अगदी झणझणीत होतं. 

1/7

लोणचं

भारतात जशी भाषेची विविधता आहे, तशीच विविधता देशात लोणच्याच्या बाबतीत दिसून येते. कोणीला आंब्याचं लोणचं आवडतं, तर कोणाला लिंबाचं...

2/7

लोणच्याची चव

दक्षिणात्य प्रदेशात लोणच्याची चव वेगळी लागते, तर उत्तरेतील लोणच्याला वेगळीच चव... इतकं काय तर राजस्थान आणि पंजाबमध्ये देखील लोणं वेगळंच लागतं.

3/7

आयोग्यासाठी फायद्याचं

मात्र, लोणचं कोणतंही असलं तरी ते तुमच्या आयोग्यासाठी फायद्याचंच ठरतं. अनेक दिवसांचं जतन केलेलं लोणचं फायदेशीर प्रोबायोटिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देणारं असतं.

4/7

प्रोबायोटिक्स

आंबवलेले लोणचं प्रोबायोटिक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फायदेशीर जीवाणूंनी भरलेलं असतात. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते अन् काही गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या देखील कमी होतात.

5/7

वजन नियंत्रणात

लोणच्यामध्ये कॅलरी कमी असतात तर फायबर जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे तुमचं वजन देखील नियंत्रणात राहतं. लोणच्यामुळे तुमचं पचन देखील व्यवस्थित होतं.

6/7

अहवाल

2018 मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात, लोणच्यासह आंबलेल्या अन्नामध्ये जिवंत प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात जे आतड्याच्या मायक्रोबायोटाची विविधता आणि संतुलन वाढवतात, असं समोर आलं होतं.  

7/7

मधुमेह

आंबलेलं लोणचं जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतं. त्यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो, अशी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.