सोशल मीडिया स्टारला IAS होण्याची इच्छा! अभ्यासक्रमही नव्हता माहिती.. 5 वेळा नापास आणि...

 दरवर्षी लाखो तरुण IAS-IPS बनण्याचे स्वप्न पाहतात. दरवर्षी यूपीएससीचे लाखो फॉर्म भरले जातात. पण त्यापैकी मोजकेच परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकतात. अशापैकी एका तरुणीची कहाणी आपण जाणून घेऊया.

| May 11, 2024, 21:24 PM IST

IAS Priyanka Goyal: दरवर्षी लाखो तरुण IAS-IPS बनण्याचे स्वप्न पाहतात. दरवर्षी यूपीएससीचे लाखो फॉर्म भरले जातात. पण त्यापैकी मोजकेच परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकतात. अशापैकी एका तरुणीची कहाणी आपण जाणून घेऊया.

1/10

सोशल मीडिया स्टारला IAS होण्याची इच्छा! अभ्यासक्रमही नव्हता माहिती.. 5 वेळा नापास आणि...

UPSC Success Story IAS priyanka goyal Career Marathi News

IAS Priyanka Goyal: आजकालचे तरुण सोशल मीडियावर प्रसिद्ध असतात. पण यातीलच एक कोणीतरी आयएएस बनण्याचं स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवत असेल तर?

2/10

IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न

UPSC Success Story IAS priyanka goyal Career Marathi News

दिल्लीची रहिवासी प्रियांका गोयलने UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. 

3/10

यूपीएससीची तयारी

UPSC Success Story IAS priyanka goyal Career Marathi News

प्रियंकाने दिल्ली विद्यापीठाच्या केशव महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. प्रियांकाने यूपीएससीची तयारी सुरू केली. फर्स्ट अटेम्ट दिला तेव्हा त्यांना अभ्यासक्रमाची माहिती नव्हती, असे म्हटले जाते. 

4/10

0.7 गुण कमी

UPSC Success Story IAS priyanka goyal Career Marathi News

दुसऱ्या प्रयत्नात फक्त 0.7 गुण कमी असल्याने त्याला कट ऑफ लिस्टमध्ये स्थान मिळाले नाही. सलग दोन वर्षांच्या अपयशानंतर प्रियंका थोड्या निराश झाल्या होत्या.

5/10

अभ्यासावर परिणाम

UPSC Success Story IAS priyanka goyal Career Marathi News

तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नातही प्रियंका पूर्वपरीक्षा पास करू शकल्या नाहीत. 4 वेळा अपयशी ठरल्यानंतर पाचव्या प्रयत्नात  पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. इतक्यात कोरोना आला. आणि त्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला. यातही यश मिळाले नाही.

6/10

पुन्हा धैर्य एकवटले

UPSC Success Story IAS priyanka goyal Career Marathi News

चार वेळा पूर्व परीक्षाही पास होऊ शकली नसली तरी आपल्या लेकीला आई वडिलांनी खूप साथ दिली. यामुळे प्रियांका यांनी पुन्हा धैर्य एकवटले आणि परीक्षेची तयारी केली. 

7/10

अभ्यासाची रणनीती बदलली

UPSC Success Story IAS priyanka goyal Career Marathi News

आता नाही तर कधीच नाही असे म्हणत प्रियांकाने अभ्यासाची रणनीती बदलली. प्रचंड मेहनत घेतली. दिवस-रात्र एक करुन अभ्यास केले. आणि आई वडिलांना अपेक्षित होते तेच प्रत्यक्षात घडले. या काळात त्यांनी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्या. यावेळी प्रियांकाने तेच केले, ज्याची तिचे पालकही वाट पाहत होते. 

8/10

सहाव्या प्रयत्नात 369 वा रँक

UPSC Success Story IAS priyanka goyal Career Marathi News

प्रियंका यांनी सहावा आणि शेवटचा प्रयत्न होता.  सहाव्या प्रयत्नात आणि 2022 च्या UPSC परीक्षेत त्यांनी 369 वा क्रमांक मिळवला आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते.

9/10

इंस्टाग्रामवर प्रियांकाचे 211K फॉलोअर्स

UPSC Success Story IAS priyanka goyal Career Marathi News

प्रियांका गोयल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे 211k  फॉलोअर्स आहेत. त्या अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ इथे शेअर करत असतात.

10/10

प्रियंका यांनी हिंमत हारली नाही

UPSC Success Story IAS priyanka goyal Career Marathi News

पाच वेळा अपयशी होऊनही प्रियंका यांनी हिंमत हारली नाही. त्यामुळे प्रियांकाची कहाणी यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उदाहरण ठरली आहे.