Aryan Khan Drugs case : पाहा आजच्या युक्तिवादात नेमके काय मुद्दे मांडले गेले
कोणाच्या वकिलांनी मांडलं काय मत, जाणून घ्या....
मुंबई : Drugs Case प्रकरणी कारागृहात असणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी सुरु झाली. यावेळी आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट याला जामीन देण्यास एनसीबीने प्रतिज्ञापत्राद्वारे विरोध केला.
आर्यन, अरबाज, मूनमून या तिघांना कोणत्याही षड्यंत्रचा आरोप न ठेवता आधी अटक करण्यात आली, अटक करण्यात आली तेव्हा कोणतही षड्यंत्र नव्हते.
किंबहुना तिघांची वागणूक आणि कृत्य हे वेगवेगळे होते. यामुळं कलम 41 A गरजेचे होते, त्यानुसार नोटीसही पाठवणे गरजेचे होते, असं म्हणत अमित देसाई यांनी ही छळवणूक आहे असा दावा केला.
सर्वोच्च न्यायालयातील एक केसचा दाखलाही त्यांनी दिला. एनसीबीच्या थिअरीप्रमाणे या प्रकरणात प्रत्येक जण वेगवेगळा त्या क्रूझवर गेला त्यामुळे कट शिजल्याचा आरोप चुकीचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
ज्यावेळी अटक करण्यात आली तेव्हा ते सहकार्य करायला तयार होते तरीही अटक का करण्यात आली, सहकार्य केलं नसतं तर अटक करायला पाहिजे होती, असं म्हणत अटक वेगळ्या कलमाखाली करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्रूजवर drugs खरेदी विक्रीसाठी ते आले नव्हते असा युक्तिवाद मांडत मूनमूनकडे 5 ग्रॅम चरस सापडले, तर अरबाजकडे 6 ग्राम चरस सापडले, मात्र रिपोर्टमध्ये मात्र 21 ग्रॅम दाखवण्यात आले, हे षडयंत्र रचत असल्याचे कोणतेही चॅट दिसत नाहीत असा मुद्दा इथे मांडला गेला.
एनसीबीच्या दाव्याप्रमाणे अरबाज मर्चंटने जबाबात चरस बाळगल्याचे मान्य केले आणि आर्यनसोबत सेवन करण्यासाठी जात होतो, असेही मान्य केले
हा कटकारस्थानाचा भाग नसून हा ट्रॅप आहे असं सांगत drugs घेणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी ncb अधिकारी तिकडे गेले होते तर blood test का करण्यात आली नाही हा सवाल अरबाजच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आला.
ज्याची कबुली देण्यात आली नाही त्यासाठी अटक करण्यात आली आहे, हा मुद्दा इथे अधोरेखित करण्य़ात आला.
ही मुले तरुण आहेत, ते experiments म्हणून असे करू शकतात, मात्र तरीही त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे, हे कॉलेज विद्यार्थी असल्याने त्यांच्यासाठी असे चॅट अतिसामान्य आहेत असा युक्तिवाद न्यायालयात मांडला गेला.