Aishwarya Rai and Abhishek Bachchan : दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आणि ड्रिम गर्ल ईशा देओल ही तिच्या नवऱ्याला 12 वर्षांनंतर घटस्फोट देणार आहे, अशी बातमी समोर आली आहे. यापूर्वी बच्चन कुटुंबात काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या महिन्याभरापासून रंगल्या आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये वाद झाले असून तिने अमिताभ बच्चन म्हणजे सासरचं घर सोडलं आणि आईसोबत राहिला गेली अशी बातमी समोर आली. (During the divorce talks with Abhishek Bachchan Aishwarya Rai said  The Bachchan family suddenly came home and big statement on the controversy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर अनेक अशा घटना घडल्या की या चर्चांना उधाण आलं. ऐश्वर्या राय बच्चन यांच्या 50 व्या वाढदिवशी अभिषेक बच्चन काय अख्खे बच्चन कुटुंब अनुपस्थित होतं. त्यानंतर अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यामध्ये काही तरी बिनसलं असल्याचं व्हिडीओ समोर आले. मुलगी आराध्याच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्या वेगवेगळ्या गाडीतून आले. हे पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्यात. अगदी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या राय हिला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. 


पण दुसरीकडे प्रो कबड्डी स्पर्धेत पिंक पँथर संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ऐश्वर्या, अमिताभ आणि अभिषेक, आराध्य सगळं एकत्र दिसून आले. त्यामुळे घटस्फोटाचा चर्चा ही निव्वळ अफवा असल्याचं बोलं जाऊ लागलं. कारण या घटस्फोटाच्या बातम्यांवर बच्चन कुटुंबातून कधीही कोणीही भाष्य केलं नाही. त्यामुळे काय सत्य आणि काय असत्य हे त्यांच माहिती. अशाच घटस्फोटाच्या चर्चेत ऐश्वर्या राय हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात तिने अभिषेक बच्चनला बेस्ट पती असं म्हटलं आहे. शिवाय अभिषेकबद्दल प्रेम आणि आदरही व्यक्त केला आहे. 


त्यात दुसरीकडे ऐश्वर्या राय हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तिने रोका सोहळ्याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली की, एक दिवस अचानक अभिषेकचा फोन आला आणि म्हणाला की आम्ही सगळे रोकासाठी घरी येत आहोत. आम्ही दक्षिण भारतीय रोका या शब्दाचा न अर्थ माहिती नाही प्रथा माहिती. त्यात माझे वडील शहराबाहेर गेले होते. 


मी त्या फोननंतर वडिलांना फोन लावला त्यांना यायला अजून एक दिवस लागणार होता. पा (अमिताभ बच्चन)  आणि आम्ही सगळे निघालो आहोत. वाटेत असून संध्याकाळी पोहोचू. ते आले आणि घरी फक्त आई होती. सगळे भावूक होतो काय सुरु आहे हे कळतच नव्हतं. 



त्यावेळी मी ख्वाजा मेरे ख्वाजा या गाण्यासाठी नववधू बनले होते. जोधा अकबरची शुटिंग सुरु होती.  तेव्हा मनात आलं हे काय सुरु आहे, ऑफस्क्रिनही तेच आणि ऑनस्क्रीनही तेच. अचानक आशुतोषने मला विचारलं की, तुझी एंगेजमेंट झाली का? आणि मी हो म्हटलं.