मुंबई : बॉलिवूडच्या या झगमगत्या दुनियेत असे अनेक सत्य आहेत, जे अद्याप कलाकारांच्या चाहत्यांना माहिती नाहीत. बॉलिवूड स्टार कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्तेत असतात. कधी चित्रपटांमुळे कधी अफेअर्समुळे तर कधी मैत्री आणि शत्रूत्वामुळे.  आपल्या सुंदर अदांनी चाहत्यांना घायाळ करणरी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे देखील शत्रू आहेत. असे काही स्टार्स आहेत, ज्यांच्यासोबत ऐश्वर्याचा 36चा आकडा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्याच्या शत्रूच्या यादीमध्ये अभिनेत्री आलिया भट्टचा भाऊ आणि अभिनेता इमरान हश्मीचा देखील समावेश आहे. इमरानने जे वक्तव्य केलं त्यामुळे ऐश्वर्या संतापली होती. 2014 मध्ये इमरान हाश्मी आणि महेश भट्ट करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये पोहोचले होते.



त्यांचा हा एपिसोड सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. यावेळी करणने इम्रानला काही प्रश्न विचारले. करणने प्लास्टिक म्हणताच इमरानने ऐश्वर्या रायचे नाव घेतले. सौंदर्य मिळविण्यासाठी ऐश्वर्याने प्लास्टिक सर्जरीची मदत घेतल्याचे इमरानचे मत होते. दरम्यान ऐश्वर्या आणि आलियामध्ये देखील वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.



इमरानचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यावर ऐश्वर्याने स्पष्ट केले की, करण जोहरच्या शोमध्ये गिफ्ट हॅम्पर जिंकण्यासाठीच इमरानने असं उत्तर दिलं. इमरानचे वक्तव्य ऐश्वर्याला अजिबात आवडले नाही. तेव्हापासून ऐश्वर्या इमरानवर रागावलेली आहे आणि कदाचित ही नाराजी आताही कायम आहे.