मुंबई : बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीने सोमवारी महत्वाचा खुलासा केला आहे. इमरानचा मुलगा अयान कॅन्सर मुक्त झाला आहे. 2014 रोजी अयान तीन वर्षांचा होता तेव्हा त्याला किडनीचा कॅन्सर झाला होता. पण आता अयान या कॅन्सरपासून मुक्त झाल्याची माहिती स्वतः इमरानने दिली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमरान हाशमीने अयानसोबत फोटो शेअर केले असून एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. पाच वर्षांनी अयान कॅन्सर मुक्त झाल्याचे घोषित केले आहे. हा एक लांब प्रवास होता. प्रार्थना आणि शुभेच्छा दिल्यामुळे आभार या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



इमरानने पुढे म्हटलं आहे की,'कॅन्सरशी दोन हात करणाऱ्या सगळ्या व्यक्तींना प्रेम आणि आशिर्वाद. आशा आणि विश्वास या दोन्ही गोष्टी याकाळात अतिशय महत्वाच्या. तुम्ही यावर देखील मात करू शकता.' इमरानने बिलाल सिद्दीकी यांच्यासोबत 'द किस ऑफ लाइफ, हाऊ ए सुपरहिरो अॅण्ड माय सन डिफीटेड कॅन्सर' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात आपल्या मुलाच्या संघर्षाची कथा आहे.