मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या चर्चेत आहे. नुकताच 'आश्रम 3' च्या ट्रेलरमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळाला. अभिनेत्रीची स्टाईल पाहून सर्वांचेच मन हरपून जातं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ईशाचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आहे.  आपल्या सेक्सी लूकने ईशा एका व्यक्तीला भुरळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मात्र ही व्यक्ती कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.


ईशासोबत डान्स करताना दिसतेय  या व्यक्तीचे नाव आहे राजीव अडातिया.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


राजीव अडातियाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत ईशा गुप्ता दिसत आहे. ईशा राजीवला तिच्या कृतीने भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि राजीव देखील ईशाच्या या कृत्यांवर आश्चर्यकारक हावभाव देताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


राजीव अडातिया हे अगदी लहानपणापासूनच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचा चेहरा आहेत. राजीव एक निर्माता, उद्योजक आणि प्रेरक वक्ता आहे. एवढेच नाही तर राजीव हा शेट्टी बहिणींच्या म्हणजे शमिता शेट्टी आणि शिल्पा शेट्टीच्या अगदी जवळचा आहेत. राजीवचे दोन्ही बहिणींसोबतचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.


ईशा गुप्ता सध्या 'आश्रम 3' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर 13 मे रोजी रिलीज झाला होता, जो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्रेलरमध्ये, ईशा गुप्ता बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन देताना दिसली. त्यामुळे 'आश्रम 3' मध्ये खूप बोल्डनेस असणार आहे हे स्पष्ट दिसतंय