अपघातानंतर शिल्पा शेट्टीची अशी अवस्था पाहून चाहते हैराण; Video Viral
काही महिन्यांपूर्वी तिनं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या अपघाताची बातमी पोस्ट (Post) करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा इंस्टाग्रामवर (Instagram) सर्वात सक्रिय सेलिब्रिटींपैकी (Celebrities) एक आहे. दिवसाचं शेड्युल ते तिच्या फिटनेस रूटीनपर्यंत, शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सर्व काही शेअर करते. काही महिन्यांपूर्वी तिनं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या अपघाताची बातमी पोस्ट (Post) करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. (Fans are shocked to see this state of Shilpa Shetty after the accident Video Viral nz)
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचा (Shilpa Shetty Kundra) दोन महिन्यांपूर्वी Indian Police Force या वेब शोच्या सेटवर अपघात झाला होता. सोमवारी, शिल्पाने गेल्या 60 दिवसांत तिच्या बरं होण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर (Share) केला आहे. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्या दिवसांमधला खडतर प्रवास तिने मांडला आहे.
आणखी वाचा - देसी पोरासोबत थिरकली फॉरेनर बाई... पाहिलात का 'हा' Viral Video
त्या व्हिडिओत शिल्पाने तिच्या व्यायामाची दिनचर्या आणि फिजिओथेरपी (Physiotherapy) सेशनची एक झलकही शेअर केली आहे. व्हिडिओच्या शेवटी, शिल्पा स्वतः चालताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य तिचा हा प्रवास लवकरच संपेल हे सांगत आहे. कशाचाही आधार न घेता ती चालू शकते याचं तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
तिने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "आज दोन महिने झाले… माझ्या दुखापतीला. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, हे सोपं नव्हतं. मानसिक वेदना (Mentally) ही शारीरिक वेदनांइतकीच तीव्र असते. माझ्यासारख्या वर्कहोलिक (Workaholic) आणि फिटनेसची (Fitness) ओढ असलेल्या व्यक्तीसाठी या सगळ्या प्रक्रियेतून जाणं तितकंच कठीण होतं, गेल्या आठ आठवड्यांत निराशा, राग, दुःख आणि असहायता या सगळ्या भावना माझ्या वाट्याला आल्या होत्या.
शिल्पा पूढे म्हणाली पण, मला माझ्या मूलीकडून लवकर बर होण्याची प्रेरणा (inspiration) नेहमी मिळत असते. प्रत्येक फिजिओथेरपी सेशनमध्ये समिषा माझ्या आसपास असायची. माझी मुलगी मी तिला उचलून घ्यावं यासाठी ती आतुरतेने वाट पाहत होती. तिचं हसू (Smile), मिठी (Hugs),आणि किस (Kiss) हेच काही तिचे दिवस मला पुन्हा हवे होते," त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा - मासिक पाळी लांबवण्यासाठी गोळ्या खाण्याऐवजी 'हे' घरगुती उपाय करुन पहा...
दरम्यान, शिल्पा पुढे सुखी या चित्रपटात दिसणार आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत (Siddharth Malhotra) रोहित शेट्टीच्या (Rohit shetty) Indian Police Force या वेब शोमध्ये (Web show) पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली होती की, शिल्पा तिची बहीण अभिनेत्री शमिता शेट्टीसोबत (Shamita Shetty) एका नवीन प्रोजेक्टसाठी काम करणार आहे. शिल्पा आणि शमिता उर्फ टुंकी आणि मुंकी (Tunki & Munki) या बी-टाऊनमधील (B-town) फॅन्सची आवडत्या भावंडाची जोडी आहे. या दोघींचे मजेशीर व्हिडिओ (Funny Videos) नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळतात.