मुंबई : अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचे पहिले फोटो लीक झाले आहेत. फोटोंमध्ये फरहान काळ्या रंगाच्या कोट-पँटमध्ये दिसत आहे. तर शिबानी लाल गाऊनमध्ये दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक वर्षांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत होती. दोघेही कधी लग्न गाठ बांधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.


अखेर या सोहळ्याचा फोटो समोर आला आहे. ख्रिश्चन पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडत असल्याचं समजतंय.



शिबानी ही मॉडेल अनुषा दांडेकर हीची बहिण आहे. शिबानी आणि फरहान गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते.फरहान अख्तर सिनेमासह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत असतो.