Fatima Sana Shaikh - Aamir Khan अडकणार विवाह बंधनात? Ira Khan च्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष
लेकीच्या आधी आमिरचंच उरकणार? फातिमासोबतच्या `त्या` क्षणांमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण
Fatima Sana Shaikh - Aamir Khan : 'दंगल' फेम अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी फातिमाने तिच्या आजाराबद्दल सोशल मीडियाच्या (fatima sana shaikh social media) माध्यमातून चाहत्यांना सांगितलं. सोशल मीडियावर जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करणारी फातिमा पुन्हा तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. फातिमाने लिहिलेल्या एका पोस्टमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे.
पोस्टमुळे आमिर खान आणि फातिमा सना शेख यांच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. फातिमानं लिहिलेल्या एका पोस्टनं या सगळ्याची सुरूवात झाली. सध्या फातिमाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (aamir khan affair with fatima sana shaikh)
फातिमाने स्वतःचा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'टु डू ऑर नॉट टू डू' असं लिहिलं आहे. ही पोस्ट आमिरच्या मुलीच्या साखरपुड्याला जाताना टाकल्यानं आमिर आणि फातिमाच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. अशात लेकीच्या लग्नाआधी आमिर लग्न उरकणार का? अशा चर्चांना देखील उधाण येत आहे.
वाचा | 'Kiss करताना देखील नागाची पहिली पत्नी...', Samantha Ruth Prabhu चा मोठा खुलासा
महत्त्वाचं म्हणजे फातिमाने शेअर केलेल्या पोस्टवर आमिरची मुलगी आयरा खानने (Ira Khan) देखील कमेंट केली आहे. त्यामुळे आयराच्या कमेंटकडे अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आयराने फातिमाच्या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
फातिमाला करावा लागला ट्रोलिंगचा सामना
फातिमाने अभिनेता आमिर खानसोबत 'दंगल' सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. त्यानंतर 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमात देखील आमिरसोबत फातिमा दिसली. ज्यामुळे आमिर आणि फातिमा (aamir khan fatima sana shaikh marriage) रिलेशनमध्ये आहेत का? अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली. आता फातिमाच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.