इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी `सॅम बहादुर`मध्ये फातिमा सना शेखने आकारले तब्बल इतके कोटी
`अॅनिमल` आणि `सॅम बहादुर` हे दोन बिग बजेट सिनेमा १ डिसेंबरला एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित `अॅनिमल` आणि मेघना गुलजार दिग्दर्शित `सॅम बहादुर` या सिनेमांमध्ये टक्कर होताना दिसणार आहे. `सॅम बहादुर` या सिनेमात फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात फातिमा माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र तुम्हाला आज आम्ही या अभिनेत्रीबद्दल असं काही सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हलाही आश्चर्य वाटेल.
मुंबई : 'अॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' हे दोन बिग बजेट सिनेमा १ डिसेंबरला एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादुर' या सिनेमांमध्ये टक्कर होताना दिसणार आहे. 'सॅम बहादुर' या सिनेमात फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात फातिमा माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र तुम्हाला आज आम्ही या अभिनेत्रीबद्दल असं काही सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हलाही आश्चर्य वाटेल.
फातिमा सना शेखच्या वडिलांचं नाव विपिन शर्मा आहे जे हिंदू आहेत आणि तिची आई राज तबस्सुम जी मुस्लिम आहे. फातिमाला सॅम बहादुर या सिनेमासाठी 1 करोड रुपये इतकी फी देण्यात आली आहे. या सिनेमात विकी कौशल सॅम मानेकशॉ या मुख्य भूमिकेत आहेत. तर फातिमा इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, तिला जेव्हा या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा ती नर्व्हस होती. तिला माहिती नव्हतं की, ती हा रोल निभावू शकेल की नाही.
अनेकदा फातिमा सना शेखचं नाव अभिनेता अमिर खानसोबत जोडलं गेलं आहे. जेव्हा अभनेत्याचा किरण रावसोबत घटस्फोट झाला तेव्हा तिलाच यामागे गृहित धरलं जात होतं. दोघं अनेकदा एकत्र बऱ्याचदा स्पॉट देखील होतात. पर्सनल पार्टीतदेखील फातिमा आमिरसोबत पोहचते. मात्र या दोघांमध्ये केवळ आणि केवळ मैत्रीचं नातं आहे.
फातिमा सना शेख एक्टिंग सोडू ईच्छित होती. ती आधी 1997 मध्ये आलेला सिनेमा 'चाची 420'मध्ये बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर ती 'वन टू का फोर'मध्ये दिसली. मात्र १५ वर्ष अभिनेत्री दूर राहिली. यानंतर ती 'बेस्ट ऑफ लक निक्की', 'लेडीज स्पेशल' आणि 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या टीव्ही मालिकांमध्ये दिसली. मात्र यासगळ्यातून तिला नाव प्रसिद्धी नाही मिळाली तेव्हा तिने सिनेसृष्टीला राम राम केला.
फातिमा सना शेखने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितंल की, तिचा एका पार्टीमध्ये अपमान केला गेला. या पार्टीत नशेत असलेल्या एका मुलीने तिच्यासोबत गैरवर्तवणूक केली. नशेत असलेली मुलीला अभिनेत्रीचे केस बांधायचे होते आणि तिच्या डोळ्याला लाईनर लावायचं होतं. त्या मुलीची गैरवर्तवणूक पाहून अभिनेत्री कंटाळून घरी गेली होती. २०१६ मध्ये आलेला दंगल सिनेमातून गीता फोगाट ही भूमिका साकारुन फातिमा घरा-घरात पोहचली.