TMKOC: `तारक मेहता का उल्टा चष्मा` चे निर्माता असित मोदीविरुद्ध FIR, काय आहे नेमके प्रकरण?
FIR on Asit Modi: तारक मेहता का उल्टा या मालिकेच्या वादग्रस्त प्रकरणात आणखी भर पडली आहे. यावेळेस पोलिसांनी थेट मालिकेचा निर्माता, ऑपरेशन हेड आणि इतर क्रू मेंबर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Asit Modi Sexual Harrasement Case: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका सततच्या वादांमुळे चर्चेच आहे. आता पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. दिग्दर्शक असित मोदीविरुद्ध ( Asit Modi ) गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच अटक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने या मालिकेचे निर्माते आणि ऑपरेशनल हेड यांच्याविरोधात मध्यरात्री पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मालिकेचे निर्माते आणि इतर व्यक्ती लैंगिक छळ करत असल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि 354 आणि 509 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या शोमध्ये श्रीमती सोधीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. अभिनेत्रीने असित मोदी तसेच तारक मेहताचे कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधात तक्रार केली होती आणि आता पोलिसांनी गुन्ही दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
मोनिका भदौरियाचा आरोप
तारक मेहता का उल्टा चष्मा अभिनेत्री मोनिका भदौरियाने सेट निर्मात्यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला होता. मुलाखतीत मोनिकाने पुढे असेही सांगितले की, सेटवर राहणे तिच्यासाठी खूप त्रासदायक होते. आता पुन्हा एकदा मोनिकाने भाष्य केले असून तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये बावरीची भूमिका साकरली. या शो ने माझे आयुष्य नक्कीच बदलले. त्यामुळेच हा शो माझ्यासाठी खूप मोठा होता, असे तिने म्हटले आहे.
जेनिफर मिस्त्री बन्सीवालनेही केला आरोप
यापूर्वी जेनिफर मिस्त्री बन्सीवालनेही निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तसेच, शोच्या निर्मात्यांव्यतिरिक्त तिने काही कलाकारांवरही लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. जेनिफरने पोलिसात तक्रार दाखल केली की निर्माता मोदीने सेटवर अनेकदा तिच्याशी गैरवर्तन केले. मालिकेचे निर्माते, प्रकल्प प्रमुख सोहेल रमाणी, कार्यकारी निर्माता, जतीन बजाज आणि दिग्दर्शकांच्या टीमने आरोपांचे खंडन करण्यासाठी अधिकृत निवेदन जारी केले. जेनिफर हे सर्व सूडबुद्धीने करत आहे कारण तिचा प्रॉडक्शन हाऊससोबतचा करार संपला आहे, असे मालिकेच्या टीमने सांगितले.