मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेत असलेला शो  'कौन बनेगा करोड़पति' (Kaun Banega Crorepati) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर अनेक लोकांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे हा शो पुन्हा एकदा वादात आला आहे. याचं कारण आहे या एपिसोडमध्ये विचारला गेलेला एक प्रश्न.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शो दरम्यान विचारल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांवर लोकांनी आतापर्यंत आक्षेप घेतला आहे. एकदा पुन्हा हा शो वादात आहे. याचं कारण आहे शो दरम्यान विचारले गेलेले प्रश्न.


हा प्रश्न ठरला चर्चेचा विषय


शो दरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांनी एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नावरुन काही लोकांनी वादंग सुरू केलं आहे. सोशल मीडियावर या प्रश्नावर जोरदार चर्चा होत आहे. 


मनुस्मृतीवरुन हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न होता, २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ.बी.आर.आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रति जाळल्या होता? उत्तर देण्यासाठी ४ पर्याय देण्यात आले होते.


A) विष्णु पुराण 
B) भगवत गीता 
C) ऋग्वेद 
D) मनु स्मृति.


हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप


या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर, अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं की, १९२७ साली डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी जातीय भेदभाव वैचारिक दृष्टीकोनातून योग्य ठरवण्याच्या कारणावरुन, प्राचीन हिंदू ग्रंथ मनुस्मृतीची निंदा केली होती. तसेच मनुस्मृतीच्या प्रति देखील जाळल्या होत्या.


मात्र हा प्रश्न काही नेटीझन्सला आवडला नाही. काही लोकांनी हा शो डाव्या विचारांचा प्रचार असल्याचा आरोप करणे सुरु केले आहे. तर काहींनी हिंदूच्या भावना दुखावणारा हा प्रश्न असल्याचा आरोप आहे.


KBC विरोधात FIR दाखल


कौन बनेगा करोड़पति (KBC)आणि या शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्याविरोधात लखनौमध्ये एक  (FIR) दाखल करण्यात आली आहे. या शोमध्ये सामाजिक कार्यकर्ता बेजवाड़ा विल्सन (Bezwada Wilson)आणि अभिनेता अनूप सोनी अतिथि म्हणून उपस्थित होते.