Gadar 2 : 'गदर 2' हा चित्रपट येणार आहे हे प्रेक्षकांना जेव्हा कळलं होतं तेव्हा सगळ्यांनाच आनंद झाला होता. पहिल्या चित्रपटातील कास्टनं सगळ्यांची मने जिंकली होती. अशात अनेकांना आशा होती की ते कलाकार आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर त्याच भूमिका करताना पाहण्यासाठी उत्सुक होते. तर 'गदर 2' चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांना तारा सिंगचं एग्रेशन पुन्हा एकदा पाहायला मिळालं. तारा आणि सकीना यांच्या केमिस्ट्रीनं पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले. तर काही असे कलाकार होते ज्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर त्याच भूमिका साकारताना प्रेक्षकांना पाहायचे होते. मात्र, प्रेक्षकांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. त्याचं कारण म्हणजे ते कलाकार आता या जगात राहिले नाहीत. त्यात अभिनेता अमरीश पुरी यांचे देखील नाव आहे. जे पहिल्या भागात सकीनाचे वडील म्हणजेच अब्बा अशरफ अली यांच्या भूमिकेत दिसले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारे कलाकार आता कसे दिसतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्यासोबत कोणते कलाकार या चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार आहे. याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. तर तारा सिंग आणि अमीषा पटेल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर 'गदर 2' मध्ये हे दोघेही चार्मिंग लूकमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात मुलाची म्हणजेच चरणजीतची भूमिका साकारणारा अभिनेता उत्कर्ष शर्मा आता खूप मोठा झाला असून हॅन्डसम दिसतो. तर सकीवाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या लिलिट दुबे देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यांच्याशिवाय इशरत अली, विश्वजीत प्रधान, मुश्ताक खान, डॉली बिंद्रा, अभय भार्गव, श्वेता सिंदे, कनिका शिवपुरी, मालविका शिवपुरी, मधुमालती कपूर, अमिता खोपकर, टॉनी मीरचंदानी, समर जय सिंग, प्रतीमा खन्ना यांचे लूक थोडे वेगळे दिसणार आहेत. 


हेही वाचा : फक्त Shah Rukh khanच नाही तर, 'या' अभिनेत्रींदेखील साकारली होती Bald भूमिका



कोणते कलाकार चित्रपटात नाहीत!


तारा सिंग ही भूमिका सनी देओलनं पहिल्या भागात साकारली होती. तर तारा सिंगचा मित्र दरमियान सिंगची भूमिका अभिनेता विवेक शौकनं साकारली होती. विवेक शौक यांचे 2011 मध्ये निधन झाले. मिथिलेश चतुर्वेदी यांनी इदरीस ही भूमिका साकारली होती. तर गेल्यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये त्यांचे निधन झाले. अमरीष पुरी यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी अशरफ अली यांची भूमिका साकारली होती. तर 2005 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला.