फक्त Shah Rukh khanच नाही तर, 'या' अभिनेत्रींदेखील साकारली होती Bald भूमिका

Celebrities With Bald Look : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान सध्या 'जवान' या त्याच्या आगामी चित्रपटातील Bald लूकमुळे चर्चेत आहेत. शाहरुखचे इतके सुंदर केस असताना आता त्याला Bald लूकमध्ये पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पण तुम्हाला माहितीये का? चित्रपटासाठी Bald लूक करणारा शाहरुख फक्त एकमेव अभिनेता नाही तर त्यासोबत अनेक कलाकारांनी केलं आहे.  

| Jul 13, 2023, 19:07 PM IST
1/6

शाहरुख खान

celebritiesinbaldlook

शाहरुख खान त्याच्या स्टायलिश लूकसाठी नेहमीच ओळखला जातो. दरम्यान, तो करिअरच्या इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा Bald लूकमध्ये दिसला असून हा चित्रपट 'जवान' आहे. 

2/6

अमिताभ बच्चन

celebritiesinbaldlook

अमिताभ बच्चन आणि विद्या बालन अभिनीत 'पा' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी केस नसलेल्या मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांचा अभिनय उल्लेखनीय होता.

3/6

संजय दत्त

celebritiesinbaldlook

हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांच्या 'अग्निपथ' चित्रपटात संजय दत्तनं 'कांचा चीना' ची भूमिका साकारली होती. संजय दत्तनं या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. 

4/6

शबाना आझमी

celebritiesinbaldlook

शबाना आझमी यांनी दीपा मेहता यांच्या 'वॉटर' चित्रपटात केस नसलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती.

5/6

तन्वी आझमी

celebritiesinbaldlook

तन्वी आझमी यांनी 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात बाजीरावा यांच्या विधवा आईची भूमिका साकारली होती. त्यांनी यावेळी मुंडण करत भूमिकेसाठी स्वत: ला बदलले होते. 

6/6

अनुष्का शर्मा

celebritiesinbaldlook

करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटात अनुष्का शर्माने कॅन्सरग्रस्त रुग्णाची भूमिका साकारली होती. ही भूमिका केस नसलेल्या व्यक्तीची होती. अनुष्या या चित्रपटात बाल्ड लूकमध्ये दिसली होती.