Ganesh Chaturthi 2023 : सर्वत्र गणेश उत्सवाची धूम असताना बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घरीदेखील गणरायाचं वाजत गाजत आगमन झालं. ढोल ताशांच्या गजरात त्याने मोठ्या उत्साहाने बाप्पाला घरी आणलं. सोशल मीडियावर गणरायाच्या आगमनाचा सोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. पोलीस गणवेशातील बाप्पाला पाहून नेटकऱ्यांनी शिव ठाकरेला ट्रोल केलं आहे. (ganesh chaturthi 2023 shiv thakare trolled for welcoming ganesh idol in police uniform video viral trending now)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी शिव ठाकरे लाल रंगाचा कुर्ता घालून गेला होता. गणरायाच्या आगमनाने अख्ख वातावरण भक्तीमय झालं होतं. शिव ठाकरेच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. पण नेटकऱ्यांनी त्याचा आनंदावर विरजन लावलं आहे. 



सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी शिव ठाकरेला धारेवर धरलं आहे. एका यूजरने लिहिलं की, देवाची खिल्ली उडवू नको असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका यूजर्सने म्हटलं आहे की, या लोकांनी देवाला जोकर बनवलं आहे. तर अजून एका कंमेंटमध्ये म्हटलं की, आम्हाला हे आवडलं नाही, हे योग्य नाही. कृपया देवाला त्याच्या खऱ्या दैवी रूपातच राहू द्या!!!



शिव ठाकरेच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर रोडीज या टीव्ही शोमधून त्याने पदार्पण केलंय. त्यानंतर तो मराठी बिग बॉसमधून घरोघरी पोहाचला.


हेसुद्धा वाचा - Ganesh Chaturthi : शिल्पा शेट्टीच्या घरी थाटामाटात बाप्पाचं आगमन, मात्र 'त्या' कृत्यामुळे नेटकऱ्यांनी घेतली शाळा


त्याची प्रसिद्धी पाहता त्याला हिंदी बिग बॉस 16 मध्ये प्रेक्षकांना पाहता आलं. सध्या तो शिव ठाकरे खतरों के खिलाडी 13 मध्ये दिसत आहे.