`या` अभिनेत्याला बसली 10 वेळा थोबाडीत...
नेमकं काय घडलं असं?
मुंबई : कलाकार आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना आनंद देत असतो. कधी या कलाकाराची भूमिका किती अप्रतिम असते की, प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाहीत. अशा अभिनयासाठी कलाकार नेहमी खास मेहनत घेत असतो. अशीच मेहनत अभिनेता गौरव सरीनने केली आहे. अभिनेता गौरव सरीन या टीव्ही शोला ''कृष्णा चली चंदन'' या शो दरम्यान एक दोन दा नव्हे तर तब्बल 10 वेळा कानाखाली पडली आहे.
या अभिनेत्याला एपिसोडच्या दरम्यान शॉटच्यावेळी तब्बल 10 वेळा थोबाडीत खावी लागली आहे. गौरवने सांगितलं की, हा सीन ट्रॉलीवर चित्रित करण्यात आला त्यामुळे कानाखाली मारली हा शॉर्ट काही लपला नाही. त्यामुळे 10 वेळा थोबाडित खावी लागली आहे. यामुळे गौरवचा गाल लाल झाला होता.
Be Positive and Ups will be more frequent than downs. #KeepShining
A post shared by Gaurav Sareen (@gaurav_sareen) on
मी कायमच शुटिंगवेळी होणाऱ्या रिटेकला महत्व देतो. आणि शॉटच्या वेळी आपलं सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करतो. ऑनस्क्रीन वडिल असलेल्या भगवान यादव यांच्या खूप जवळचा आहे. त्यामुळे हा सीन झाल्यानंतर मी त्यांची गळाभेट घेतली.
गौरव सरीनने या शोमध्ये अभिनेता गोविंदाप्रमाणे काही गोष्टी स्वीकारल्या आहेत. मी या शोमध्ये उत्तर प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीची भूमिका करत आहे तर मला तेथील स्थानिक भाषा आणि डान्स शिकला पाहिजे. त्यामुळे ते माझ्यासाठी देवाप्रमाणे आहेत.