Gautami Patil Video : गौतमी पाटीलचा झाडामागील `तो` व्हिडिओ व्हायरल
गौतमी केवळ इंटरनेटवरच नाही तर डान्सच्या जगातही एक प्रसिद्ध नाव आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी गौतमी यावेळी पुन्हा एकदा एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.
मुंबई : सबसे कातील गौतमी पाटील... नेहमी चर्चेत असणारी गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर गौतमीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच गौतमीने इंन्स्टाग्राम १ मिलीयन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे. गौतमी पाटीलचा (Gautami Patil) क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला गौतमी पाटीलकडून तक्रार दाखल करण्यात आली होती.
गौतमी केवळ इंटरनेटवरच नाही तर डान्सच्या जगातही एक प्रसिद्ध नाव आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी गौतमी यावेळी पुन्हा एकदा एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. नेहमी तिचे रिल्स तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करते. पुन्हा एकदा गौतमीचा एक रिल व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौतमी झाडामागे डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना आवडला आहे. तिचे कातील एक्सप्रेशन तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहेत.
दरम्यान गौतमी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना आहे. ती अनेक कार्यक्रमांमध्ये लाइव्ह परफॉर्मन्स देत असते. राजकीय कार्यक्रम असो किंवा वाढदिवसाची पार्टी गौतमीला आमंत्रणं येतातच. गौतमीच्या एका महिन्यातील सगळ्या तारख्या फुल्ल असतात. कार्यक्रमांच्या घेऊ तितक्या सुपाऱ्या कमी आहे, अशी अवस्था गौतमीची झाली आहे. यामुळेच ती तिच्या प्रत्येक परफॉर्मन्ससाठी भरमसाठ रक्कम घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एका डान्स परफॉर्मन्ससाठी 1 ते 2 लाख रुपये घेते आणि तिची टीम दरमहा 30-35 लाख रुपये सहज कमावते.
दिवसेंदिवस गौतमीची क्रेझ वाढतच असल्याचं चित्र दिसतंय. गौतमी तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि अनेकदा ती तिच्या आईसोबत फोटो शेअर करताना दिसते. गौतमीचे माझ्यासोबतचे सुंदर बॉन्डिंग फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसतं. गौतमी सोशल मीडियावर कायम तिचे व्हिडिओ शेअर करत असते.