Ghoomar Review : नुकतात अभिषेक बच्चन आणि सय्यामी खैर यांचा घूमर हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात सैयामी खैर आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा एका जिद्दी महिला क्रिकेटरवर आधारित आहे. जी क्रिकेटमध्ये स्वत:ला झोकून देते. या सिनेमात सैयामी खैरचं नाव अनिना असं दाखवण्यात आलं आहे.  जी एक उत्कृष्ट फंलदाज असते. एकीकडे तिचं क्रिकेट संघात सिलेक्शन झाल्यामुळे तिच्या आजुबाजूला आनंदाचं वातावरण असत.  यानंतर अभिषेक  तर दुसरीकडे मात्र अचानक तिच्या अपघातानंतर तिचा उजवा हात गमावते. आणि तिंच आयुष्य पुर्णपणे बदलतं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनषेक बच्चन याने पॅडी हे पात्र साखरलं आहे.   यानंतर  पॅडी तिला पुन्हा एकदा खेळण्यासाठी बळ देतो. आणि गोलंदाज होण्यासाठी तिला इंन्सपाएर करतो.  यानंतर ती पुन्हा एकदा कशी मेहनत घेते आणि एक फलंदाज गोलंदाज कशी होते हे दाखवण्यात आलं आहे. या सिनेमातून एका जिद्दी खेळाडूची कहाणी जीव ओतून सांगण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडू त्याच्या खेळावर कसं प्रेम करतो हे सांगण्याचा या सिनेमातून प्रयत्न केला गेला आहे. 


पॅडी अनिनाला  बॉलिंग करताना एक फिरण्याची स्टाईल शिकवतो. यावरुनच या सिनेमाचं नाव घुमर असं ठेवण्यात आलं आहे. हा चित्रपट पाहताना अनेक वेळा तुमचे डोळे ओले होतील, तर अनेक वेळा तुमच्या आयुष्यातील अडचणींशी लढण्याची हिंमतही मिळेल.


कशी आहे सिनेमात सैयामी खैरची एक्टिंग
सैयामीने या सिनेमात जीव ओतून अभिनय केला आहे. तिने या सिनेमातून केलेल्या अभिनयामुळे ती उंचीच्या शिखरावर पोहचेल यात काही शंका नाही. बॉडी लँग्नेज असो की, मग तिचा अभिनय असो ती या सिनेमात उजवीच असल्याचं पहायला मिळालं. 


कसा आहे अभिषेक बच्चनचा अभिनय 
अभिषेकने सुद्धा त्याच्या अभिनयातून 100% दिले आहेत. तो यावेळी प्रशिक्षकाच्या भूमिकेतून दिसला. या भूमिकेतून तो प्रेक्षकांची मने जिंकेल यात काहीच शंका नाही.  यावेळी तो असा प्रशिक्षक दाखवला आहे की, तो एक खेळाच्या बाबतीत शिस्तप्रिय आहे. मात्र तेवढाच तो तिच्यावर मेहनत घेतो. ज्याचा फायदा तिला फायनल खेळताना होतो. त्यामुळे अभिषेकने हे पात्र खूप उत्कृष्टरित्या पार पाडलं आहे.


याचबरोबर अमिताभ बच्चन यांच्या कॅमिओने चित्रपटाला चारचांद लावले आहेत. ते या चित्रपटात समालोचकाच्या भूमिकेत दिसले आहेत. या सिनेमात त्यांची एट्री होताच  उर्जेचा डोस मिळतो त्यामुळे या सिनेमासाठी ते ट्रीटपेक्षा कमी नाही.


आर बाल्कीच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर यावेळीही तो नेहमीप्रमाणेच परफेक्ट आहे. याचबरोबर या सिनेमातील डायलॉगही खूप प्रभावित करतात. चित्रपट कोणत्याही क्षणी कंटाळवाणा किंवा संथ वाटत नाही, फक्त पहिला भाग थोडा खेचल्यासारखा वाटतो मात्र सिनेमाच्या दुसऱ्या भागात तेवढीच सिनेमा पाहताना मज्जा येते. काहीक्षणी तुमचे डोळेही पाणावतील.  जर तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल तर तुमच्यासाठी  ही परफेक्ट ट्रिट आहे. 


या ५ कारणासाठी आवश्य पाहा हा सिनेमा
सिनेमातून आपण एका खेळाडूची जिद्दी वृत्ती पाहणार आहोत त्यामुळे हा सिनेमा नक्कीच पाहावा. 
याचबरोबर या सिनेमातील बीग बींचा कॉमेंट्रीसुद्धा एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही.
हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. 
हरल्यानंतर पुन्हा एकदा जिंकण्याची जिद्द कशी असते हे या सिनेमातून उत्तमरित्या मांडलं आहे.
शबाना आझमी, बीग बी, अभिषेक बच्चन सैयामी खैर. प्रत्येक प्रत्येक कलाकाराने जीव ओतून अभिनय केला आहे.


या सिनेमातील काय खटकलं
सिनेमा सुरुवातीला थोडा कंटाळवाणा वाटतो. किंवा लांबवल्यासारखा वाटतो. याचबरोबर या सिनेमा एक कॉमन सिनेमा वाटू शकतो. जसा सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर ही स्टोरी पुढे काय आहे. याचे अंदाज तुम्ही लावू शकता.


एकंदरित कसा आहे सिनेमा
'घूमर' हा असा सिनेमा आहे जो प्रत्येकाला जगण्याची आणि जिंकण्याची आशा देणारा आहे. हा चित्रपट अभिषेक बच्चन आणि सैयामी खेरच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरणार आहे.


त्यामुळे 'झी 24' कडून 'घूमर' या सिनेमाला मिळतायेत 4 स्टार.


Movie Name : Ghoomer
Movie Riview : घूमर
Star Rating : 4
Realese Date : 18-08-2023
Directer : R.Balki