मुंबई : दाक्षिणात्य कलाविश्वाचे सुपरस्टार मोहनलाल आज आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहेत. केरळमध्ये आपल्या कुटुंबासोबत त्यांनी आपला जन्मदिन साजरा केला. शिवाय आपल्या जन्म दिवसाचे औचित्य साधत त्यांनी चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. त्यांनी २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम' चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या 'दृश्यम २' चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित केलं आहे. चित्रपटाचा टीझर २० सेकेंदांचा आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एंटनी पेरुमबवूर हे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत तर दिग्दर्शक जेथु जोसफ यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी असणार आहे. मोहनलाल यांनी चित्रपटाचा टीझर  ट्विटरच्या माध्यमातून प्रदर्शित केला आहे. सोशल मीडियावर हा टीझर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


'दृश्यम २' चित्रपटामध्ये मोहनलाल जोर्गेकुटी ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. आपल्या मुलीने केलेल्या खूणाचं रहस्य लपवण्याचे काम त्यांनी या चित्रपटात केले आहे. महत्वाचं म्हणजे सरकारकडून परवानगी मिळताच चित्रपटाची शुटिंग सुरू करण्यात येणार आहे.