मुंबई : 'जय भीम' या दाक्षिणात्य चित्रपटापासून प्रेरणा घेत आयआयटी मद्रासमधील एका विद्यार्थिनीनं सोबतचे विद्यार्थी आणि इतर 7 जणांविरोधात कायदेशीर लढा पुकारला. हे 7 जणही विद्यार्थीच असल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थिनीनं या व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करत कामाच्या ठिकाणीही छळ करण्याचा आरोप केला आहे. 


तक्रारीमध्ये या तरुणीनं शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचं सांगत थिसिससाठी प्रयोगशाळेतील साहित्य वापरण्यावरही बंदी लावण्यात आणल्याचं धक्कादायक वास्तव समोर आणलं. 


मातृभाषा एकसारखीच असल्यामुळं सुरुवातीला 'त्या' विद्यार्थ्यांनी तिच्याशी मैत्री केली. यानंतर तिचा फायदा घेत लैंगिक शोषण केलं. 


सुरुवातीला तिनं याकडेही दुर्लक्ष करत शांत राहणं पसंत केलं. पण, अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यापासूनही तिला थांबवण्यात आलं. ज्यामुळं अखेर तिनं कायदेशीर वाट आपलीशी केली. 


एफआयआरमध्ये सांगितल्यानुसार आरोपीनं हा वाद मिटवण्याच्या उद्देशानं तिला एके रात्री लॅबमध्ये बोलवून तिच्यावर अत्याचार केले आणि अश्लील फोटो घेत तिला धमकीही दिली. 


चार वर्षांपर्यंत आपल्यावर होणारे हे अत्याचार ती सहन करत होती. तिनं आत्महत्येचं पाऊलही उचललं. मित्रांमुळं तिचा जीव वाचला. तिथं कुटुंबानंही तिच्याकडे पाठ फिरवली. ज्यानंतर अखेर तिनं संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रकरणी तक्रार केली. 


एका समितीकडून करण्यात आलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. जिथं या मुलीचं दोनदा लैंगिक शोषण झाल्याचं कळलं. यामध्ये आरोपीला त्याच्या 3 मित्रांनीही साध दिली होती. ज्यानंतर त्यांना सदर संस्थेच्या परिसरात तोवर प्रवेश नाकारला जोवर या मुलीचं पीएचडी शिक्षण पूर्ण होत नाही. 


पण, कोरोना आला आणि आरोपीसुद्धा तिच्यासोबत ऑनलाईन वर्गात सहभागी झाले. हा तिच्यासाठी हादरा होता. दरम्यानच्या काळात मनात ही खदखद असतानाच या मुलीनं 'जय भीम' हा चित्रपट पाहिला आणि तिच्यात वेगळी उर्जा संचारली. 


तिनं थेट न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासी संपर्क साधला. त्यांनी तिला इंडिया डेमोक्रेटिक वुमेंस एसोसिएशन (AIDWA) च्या राज्य महासचिव सुगंती यांच्याकडे पाठवलं. 


पुढे एफआयआर दाखल होताच तामिळनाडू पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. शैक्षणिक संस्थांमध्येही जात, धर्म आणि पंथावरून हे असे प्रकार घडक असतील तर वेळोवेळी न्यायनिवाडा हा झालाच पाहिजे. 


त्याहूनही या मानसिकतेच्या मुळावरच घाला घालत समाजात तळागाळाच्या घटकांनाही अपेक्षित मान दिला गेलाच पाहिजे हेच या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित करण्यात आलं.