मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. फक्त अभिनय आणि सौंदर्यच नाही, तर कोणत्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण न घेता अमृताने तिच्या डान्सने (amruta khanvilkar dance) प्रत्येकाला थक्क केलं आहे. 'वाजले की बारा', 'चंद्रा' (chandramukhi) अशा एकापेक्षा एक लावण्यांवर ठेका धरत अमृताने चाहत्याने (amruta khanvilkar's fan ) तिच्या तालावर थिरकायला भाग पाडलं आहे. कायम डान्समुळे चर्चेत असणारी अमृता आज एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चंद्रमुखी' सारख्या सिनेमात दमदार अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर  बोलबाला केला होता. प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमा  २९ एप्रिल 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात अमृता खानविलकर चंद्राच्या भुमिकेत झळकली. आता या सिनेमानंतर अमृताच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येतेय. लवकरच अमृता 'ललिता शिवाजी बाबर' यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. अमृताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.



जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा 'ललिता शिवाजी बाबर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून पुढील वर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा 'ललिता शिवाजी बाबर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषि नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा तिचा पहिलाच बायोपिक आहे.