Govinda's Wife Sunita: दिग्गज बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते. त्याशिवाय सुनीता आहूजा ही तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीतानं खुलासा केला की तिचे तिच्या नवऱ्यासोबत अर्थात गोविंदासोबत कसे संबंध आहेत. ते दोघे एकमेकांसोबत गप्पा मारतात पण त्या दोघांचे सर्वसामान्य नवरा-बायकोसारखे संबंध नाही. त्याशिवाय तिला अजूनही वाटत नाही की ते दोघं नवरा-बायको आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनीतानं ही मुलाखत 'टाइम आउट विद अंकित' पॉडकास्टला दिली आहे. सुनीतानं सांगितलं की 'आम्ही एकमेकांना शिवीगाळ करतो. त्याशिवाय मी नेहमी गोविंदाला विचारते की तू काय माझा नवरा आहेस रे? मला अजूनही या गोष्टीवर विश्वास होत नाही. तर आम्हाला पाहून माझ्या मुलाचे मित्र देखील असं म्हणतात की तुझ्या आईसारखी माझी आई असती तर किती चांगलं झालं असतं. मी स्वत: कधी खोटं बोलत नाही. इतकंच नाही तर मला असे लोक आवडत नाही जे खोटं बोलतात.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सुनीतानं पुढे सांगितलं की 'मी खूप लवकर भावूक होते. माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या नवऱ्याविषयी विचार करते. मात्र, हे देखील आहे की मी खूप स्ट्रॉंग आहे असं दिसतं. पण मी मूर्ख नाही.' 


पुढे याविषयी आणखी सांगत सुनीता म्हणाली, 'जेव्हा तिनं गोविंदाच्या आईसाठी मिनीस्कर्टच्या जागी साडी नेसायला सुरुवात केली होती. त्यावेळी गोविंदानं काय सल्ला दिला होता. याविषयी सांगित म्हणाली तो म्हणाला होता की माझ्या आईला असं काही चालणार नाही. मी म्हणाले ठीक आहे. मी साडी नेसेन, त्यात काय फरक पडणार आहे.'


प्रेमासाठी काय काय केलं हे सांगत सुनीता म्हणाली, 'हे कोणत्या प्रकारचं प्रेम होतं. मी साडी नेसण्यास होकार दिला होता, कारण त्यानं काही फरक पडत नव्हता. मला कोणत्याही प्रकारे त्याचा होकार हवा होका. सुनीता ही तिच्या मोकळेपणासाठी ओळखली जाते. ती फक्त एक चांगली पत्नीच नाही तर त्यासोबत एक चांगली आई आहे असे नेहमी बोलतात.' 


हेही वाचा : स्वत: चं चुकीचं नाव ऐकताच चिडली कीर्ति सुरेश! 'डोसा' ओरडताच पापाराझींना दिलं उत्तर


गोविंदाकडून काय शिकली असं विचारताच सुनीता म्हणाली, 'गोविंदाकडून मी काहीच शिकले नाही. हा, पण त्याच्या आईकडून मी शिकले. गोविंदाला तर मी शिकवलं आहे. सुनीतानं सांगितलं की गोविंदासोबत लग्न करून 18 वर्ष झाली. पण मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची एडजेस्टमेंट करण्यासाठी तयार होता. चीचीनं मला सगळ्यात आधी सांगितलं होतं की जोपर्यंत आई आहे तो पर्यंत आईचं म्हणणं ऐकाव लागेल. त्यानंतरच तू सांगशिल तसं होईल.' सुनीतानं सांगितलं की 'लग्नानंतर मी एकत्र कुटुंबात राहत होते. मी गोविंदासाठी सगळंकाही सहण केलं.'