Govinda Health : मिसफायर झाल्यानं अभिनेता गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि चाहत्यांना धक्काच बसला. पण, वेळीच उपचार घेतल्यानं गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त समोर येताच अनेकांना दिलासा मिळाला. चाहत्यांच्या मनातील चिंता पाहून खुद्द या अभिनेत्यानंच आपल्या प्रकृतीविषयीची माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं गोविंदाच्या नावाचीच चर्चा सुरु झाली असताना तिथं चाहत्यांनी या अभिनेत्याविषयीची माहिती जाणून घेण्यात उत्सुकता दर्शवली आणि त्यातूनच काहीशी अनपेक्षित माहितीसुद्धा समोर आली. गोविंदा हिंदी सिनेजगतातील सर्वात यशस्वी कलाकारांपैकी एक. 90 च्या दशकात त्यानं 49 चित्रपट साइन करत सर्वांनाच थक्क केलं होतं, बिग बी अमिताभ बच्चन यांचाही यात समावेश. पण, 2000 नंतर मात्र त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. अभिनेत्याकडे कोणतंही काम नसल्यानं तो बेचैन झाला होता. 


अंधश्रद्धेचा आधार? 


चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितल्यानुसार गोविंदाच्या कारकिर्दीतील उतरत्या कळेला त्याची अंधश्रद्धाच कारणीभूत ठरली. तो ज्योतिषशास्त्र विशारदांच्या इतक्या प्रभावाखाली होता, की अभिनेत्यानं काय करावं आणि काय करु नये हेसुद्धा तेच सांगत असत. 


हेसुद्धा वाचा : जीवाभावाच्या मित्र- मैत्रिणींनाही सांगू नका वैवाहिक आयुष्यातील हे 5 सिक्रेट; नाहीतर होईल पश्चाताप 


नाहटा यांच्या माहितीनुसार 'पेन'सुद्धा तुला उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरेल असं त्याला सांगण्यात आलं होतं. याच कारणामुळं गोविंदानं चक्क 'जीतो छप्पर फाड के' या शोच्या सेटवर पेन आणण्यास बंदी घातली होती. पेनाविषयी एखाद्या पत्रकारापासून धोका असू शकतो, चुकीचं लिहिलं जाऊ शकतं असं ज्योतिषाला सुचवायचं असावं, पण गोविंदानं मात्र हा सल्ला फारच गांभीर्यानं डोक्यात ठेवला आणि टोकाचाच निर्णय घेतला. गोविंदाच्या सांगण्यावरून प्रेक्षकांसह सेटवर येणाऱ्य़ा कोणत्याही व्यक्तीला बाहेरून पेन सोबत आणण्याची बंदी होती, त्यांनी पेन बाहेरच ठेवून येणं अपेक्षित होतं. 


गोविंदा यांच्या अंधश्रद्धेविषयी अनेक कलाकारांना कल्पना होती. किंबहुना त्यांच्या वागण्यातील वेगळेपणही अनेकांच्याच लक्षात आलं होतं. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या गोविंदानं लोकांना चक्क कपडे बदलण्याचेही निर्देश दिल्याचं सांगितलं जातं.