मुंबई : बॉलिवूडमधल्या अभिनेता, अभिनेत्रींचे लहाणपणीचे फोटो आपण पाहिले असतीलचं. मात्र मोठे झाल्यावर हेच कलाकार ओळखू येत नाही.  
अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याचा लहाणपणीचा फोटो समोर आला आहे. या अभिनेत्यांच बॉलिवूडमधल्याचं प्रसिद्घ अभिनेत्री सोबत नुकतेच लग्न झाले होते. या अभिनेत्याने अनेक चित्रपटात उत्कृष्ट अभिनयही केलाय. तूम्ही या अभिनेत्याला या फोटोवरून ओळखू शकता का ? नसेल तर आम्ही तूम्हाला या अभिनेत्यबाबत खाली माहिती देणार आहोत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांच्या मांडीवर बसलेल्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. या अभिनेत्याच्या कुटूंबियातील एकाने हा फोटो सोशल साईटसवर शेअर केला आहे. मात्र या अभिनेत्याला कुठल्याही परिचयाची गरज नाही. बॉलीवूडमधला आघाडीचा हा अभिनेता आहे. विविध चित्रपटात त्याने अभिनयाची चुणूक दाखवलीय.  


इतक्या सर्व हिंट देऊन तूम्हाला अभिनेता कळालाच असेल. परंतु ज्यांनी अद्याप त्याला ओळखले नाही त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की फोटोमध्ये दिसणारे हे गोंडस लहान मूल दुसरे तिसरे कोणी नसून विकी कौशल हा अभिनेता आहे. विकीने संजू, उरी आणि असंख्य चित्रपटात अभिनय केला आहे. तसेच त्याने नुकतेच  बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोबतही लग्न केले होते. सध्या हे दोघेही कपल विदेशात वेकेशनवर गेले आहेत.  


वडिलांनी केला फोटो शेअर 
विकीच्या वडिलांनी त्याचा हा फोटो शेअर केला, तेव्हा पाहता पाहता हा फोटो व्हायरल झाला. या फोटोत वाढदिवसाच्या शुभेच्छा पुत्तर, तुझ्यासारखा मुलगा मिळाल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे... रब राख... असे वडिलांनी लिहले आहे.