Gurudas Maan Apology : लोकप्रिय पंजाबी सिंगर गुरदास मान यांनी त्यांच्या आवाजनं नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यांच्या गाण्यात श्रोत्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. खरंतर, गायक अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. गुरदास मान लवकरच त्यांच्या अमेरिका टूरवर निघाले आहेत. पण ऑक्टोबरमध्ये त्यांच्या या ट्रिपआधी शीख समुदायाच्या लोकांना दुखावल्यामुळे त्यांची माफी मागितली. त्यांचं आणखी एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


काय आहे संपूर्ण प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून गुरदास मान यांनी त्यांच्या परदेशातील दौऱ्या दरम्यान, जे तरुण त्यांच्या शोचा विरोध करत होते त्या तरुणांसाठी एक अभद्र भाषेचा वापर केला. तर त्याच्या आधी त्यांनी मातृभाषेला घेऊन सांगितलं की आधी हिंदी त्यांची मातृभाषा होती आणि मग पंजाबी. पण सगळ्यात मोठा वाद तेव्हा झाला जेव्हा गुरदास मान यांनी 2021 मध्ये नकोदरच्या डेरा बाबा मुराद शाह जत्रेत भाषणात म्हटलं की तिथे असलेल्या दरगाहच्या लाडी साई शीखांचे तिसरे गुरु, गुरु अमर दास जीचे वंशज आहेत. 


या वक्तव्यावर शीख संघटनांनी गुरदास मान यांच्यावर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी गुरदास मान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून त्यांच्या अटकेविरोधात आंदोलन केले होते. या प्रकरणी गुरदास मान यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला होता. मात्र, त्यांनी या सगळ्या घटनांवर एक गाणंही गायलं होतं, त्यामुळे गदारोळ झाला होता. गुरदास मान यांनाही अनेकांनी शिवीगाळ केली.


हेही वाचा : जायद खानकडे 1500 कोटींची संपत्ती? फ्लॉप चित्रपटांनंतर श्रीमंत कसा सांगत म्हणाला, 'तुम्ही फेरारी...'


दरम्यान, 'दैनिक भास्कर' च्या रिपोर्टनुसार, आता गुरदास मान यांनी सांगितलं की 'मी कान पकडून माफी मागतोय. मी शीख धर्मासाठी जे गाणं गायलं होतं, त्यात असं काहीच नव्हतं, ज्यामुळे कोणाला वाईट वाटेल. तरी देखील कोणाला वाईट वाटलं. तरी सुद्धा कोणाला माझ्या कोणत्या गोष्टीचं किंवा कोणत्या शब्दाचं वाईट वाटलं असेल तर माफी मागतो. पण मला दु:ख या गोष्टीचं आहे की मी माझ्या गुरुंसाठी गाणं गायलं होतं. मी तर विचार करत होतो की पंजाबी लोकांना मोठ्या मनाचे म्हणतात, पण माझं चुकलं किंवा मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा. कारण शेवटी प्रेक्षकांनी मला स्टार बनवलं आहे.'