मुंबई : बॉलीवूड स्टार धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची लव्हस्टोर एखाद्या सिनेमा पेक्षा कमी नाही. एका वृत्तानुसार धर्मेंद्र यांच्या आधी हेमा मालिनी जितेंद्र बरोबर लग्नबंधनात अडकणार होत्या. हे दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे एवढंच नव्हे तर, हेमामालिनी यांच्या परिवाराला सुद्धा जितेंद्र खूप आवडायचे. एका रिपोर्टनुसार जितेंद्र आणि हेमामालिनी यांच्या लग्नाची डेट सुद्धा फिक्स झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हणतात की, लग्न मद्रासमधील एका हॉटेलमध्ये  होणार होतं. ज्या दिवशी लग्न होणार होतं. त्याच दिवशी अभिनेते धर्मेंद्र जितेंद्रची गर्लफ्रेंड शोभासोबत तिथे पोहोचले एका रिपोर्टनुसार, या लग्नसोहळ्या मध्ये बरीच खळबळ उडाली होती. हे लग्न थांबवण्यासाठी दोघंही चेन्नईला रवाना झाले. ही वेगळी बाब की, नंतर धर्मेंद्र यांनी हेमासोबत दुसरं लग्न केलं. हे ब्रेकअप पाहून हेमा यांचे वडील नरवस झाले. त्यानंतर त्यांनी धर्मेंद्रला तिथून निघून जाण्यास सांगितलं 


त्याचबरोबर जितेंद्र आणि हेमामालिनी यांना हे लग्न थांबवणं आणि थोडा वेळ एकमेकांना देणं हे योग्य वाटलं. मग काय या दोघांनीही फायनली वेगळा व्हायचा निर्णय घेतला. हेमाशी लग्न करण्याचं जितेंद्र यांचं स्वप्न अधूरच राहिलं. त्यानंतर जितेंद्र यांनी 1976 मध्ये गर्लफ्रेंन्ड शोभाशी लग्न केलं. अनेक मुलाखतीमध्ये हेमामालिनी यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या वडिलांना धर्मेंद्र आधी अजिबात पसंद नव्हते. 


एकदा एका मुलाखतीदरम्यान जेव्हा त्यांना विचारलं गेलं की, त्यांनी हेमाला कधी प्रपोज केलं आहे का? यावर जितेंद्र म्हणाले, 'मला माझ्या आयुष्यातील त्या विषयावर बोलायचं नाही. कारण आमची मुलं मोठी झाली आहेत. याबद्दल आता बोलणं लाजिरवाणं ठरेल. '