Mahesh Manjrekar यांचं 14 वर्षे लहान Namrata Shirodkar सोबत जोडलं गेलं होतं नाव, इंटरेस्टिंग आहे लव्हस्टोरी
Mahesh Manjrekar Birthday : प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचा आज वाढदिवस आहे. दिग्दर्शक म्हणून काम करायचं होतं पण ते अभिनेते झाले. शिवाय तुम्हाला नम्रता शिरडोकर आणि महेश मांजेकर यांची लव्ह स्टोरी माहितीये का?
Mahesh Manjrekar Birthday : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गाजवणारे महेश मांजेकर यांनी आयुष्यात अनेक संकट झेलले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते म्हणून त्यांनी आज आपलं सिनेसृष्टीमध्ये दबदबा निर्माण केलाय. महेश यांचा जन्म मुंबईतील मराठी कऱ्हाडे कुटुंबात झाला. लहानपणापासूनच सिनेसृष्टीच आकर्षण त्यांना होतं. दिग्दर्शक म्हणून करिअर करायचं होतं पण ते अभिनेता झाले. त्यांना मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात प्रवेश करावा लागला. त्यानंतर 1999 मध्ये वास्तव सिनेमातून त्यांनी दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. (happy Birthday Mahesh Manjrekar affair with Namrata Shirodkar interesting love story)
दोन लग्न!
महेश मांजरेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी 1987 मध्ये कॉस्च्युम डिझायनर दीपा मेहताशी लग्न केलं खरं पण हे नातं जास्त काळ टिकलं नाही. त्यांनी 1995 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मेधा मांजरेकर यांची एन्ट्री झाली. 1995 मध्ये महेश मांजरेकर यांनी मेधा यांच्याशी लग्न केलं. त्यांनानतीन मुलं आहेत.
हेसुद्धा वाचा - PHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांचा वडील 1200 कोटींचा मालक
अशी आहे नम्रतासोबतची लव्ह स्टोरी
पण फार कमी लोकांना महेश मांजेकर आणि नम्रता शिरोडकर यांची लव्ह स्टोरी माहितीये. मिस इंडियाला खरी ओळख महेश मांजेकर यांच्या वास्तव मधून मिळाली. हाच तो काळ होता जेव्हा महेश आणि नम्रता शूटिंगदरम्यान एकमेकांच्या जवळ आलेत. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. कारण त्यावेळी महेश मांजेकर विवाहित होते. 14 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत प्रेम आणि मग नात्याला ब्रेक. त्यावेळी नम्रताच्या आयुष्यात दुसरा महेश आला. साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत तिने लग्न केलं.
हेसुद्धा वाचा - जेव्हा विवाहित Nana Patekar पडले होते Manisha Koirala च्या प्रेमात; एका अभिनेत्रीशी वाढत्या जवळिकीमुळे अधुरी राहिली love story
'या' चित्रपटामुळे वादात अडकले
एका चित्रपटामुळे महेश मांजेकर मोठ्या संकटात सापडले होते. या चित्रपटामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यांनी 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा'(Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या चित्रपटात महिलांसोबत लहान मुलांचं अश्लिल कृत्य दाखवल्यामुळे महिला आयोगापासून त्यांना अनेकांना उत्तरं द्यावी लागली.