Rakhi Sawant Kissing Case: अभिनेत्री राखी सावंत ही कायमच आपल्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. नाहीतर काही ना काही कॉन्ट्रोव्हर्सी काढून ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असते. वयाच्या 44 वर्षीही राखी सिंगल आहे. परंतु आत्तापर्यंत ती तिच्या अनेक वादग्रस्त रिलेशनशिप्ससाठी ओळखली जाते. मागच्या वर्षी तिच्या आदिल दुरानीसोबतच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु त्यानंतर लग्न मोडल्यापर्यंतही त्यांचे प्रकरण जाऊन पोहचले होते. त्यामुळे ती मागच्या वर्षी चांगलीच चर्चेत होती. आपल्या वादग्रस्त प्रकरणांसाठी ती चांगलीच ओळखली जाते. परंतु आजही लोकांना आठवते ते तिचे आणि मिका सिंगचे कीस प्रकरण. 2006 साली एक इव्हेंटनंतर मिका सिंग यानं राखी सावंतला जबरदस्ती कीस केले होते. त्यानंतर राखी सावंत हिनं पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज त्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. तब्बल 17 वर्षांपुर्वीचे हे प्रकरण आता बंद झाले असून कोर्टानं गायक मिका सिंग याला दिलासा दिला आहे. कोर्टात हा गून्हाच रद्द केला आहे. आता राखी सावंत यावर कोणतं पाऊल उचलणार यावर आता तिच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. परंतु थांबा, याप्रकरणी खुद्द राखी सावंतची समंती आहे. राखी सावंत हिला 2006 साली मिका सिंगनं जबरदस्ती कीस केले होते. मिका सिंगच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मिका सिंगनं आपल्या मित्रमैत्रिणींना आमंत्रित केले होते. यावेळी मिकानं आपली खास मैत्रीण राखी सावंत हिलाही आमंत्रित केले होते. याप्रकरणावरून राखी सावंत हिनं त्याच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली होती.  


हे प्रकरण मिटवण्यासाठी मिका सिंगच्या जुन्या बॅंडमधील एका मित्रानंही राखीला विनंती केली होती. राखीनं तिच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, मी आणि गायक मिका सिंग यांनी हा प्रश्न सौहार्दपूर्णरीतीनं सोडवला असून या प्रकरणी 11 जून 2006 रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होती. मिका सिंगनं मुंबईतील एका पॉश रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. तिथे राखीला त्यानं जबरदस्ती किस केलं होतं. त्याच्याविरूद्ध आयपीसी कलम 354 (विनयभंग) आणि 323 (प्राणघातक हल्ला) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. 


हेही वाचा - माशांऐवजी जाळ्यात सापडली चक्क फोर व्हिलर! तब्बल 33 वर्ष जुनं रहस्य झालं उघड


न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्यायमूर्ती एस.जी.दीघे यांनी राखीनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर कारवाई करत खंडपीठानं या प्रकरणातील एफआयआर आणि आरोपपत्र रद्द केले आहेत. राखी सावंतला कीस केल्यानंतर त्यावेळी हा व्हिडीओ तेव्हा टेलिव्हिजनवर चांगलाच टीआरपी मिळवत होता. तेव्हा सोशल मीडिया नव्हता परंतु आताही तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो.