Viral News of Jeep Founded From Water: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होतोना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक इसम हा सोशल मीडियावर मासे पकडायला गेला होता तेवढ्यात त्याच्या हाताला काहीतरी वेगळेच लागले. जी गोष्ट त्याच्या जाळ्यात अडकली ती तब्बल 32 वर्षे जूनी होती त्यामुळे नेटकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे. या व्हिडीओत तुम्हाला जे दिसेल ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण मासे पकडायला गेलेल्या या इसमाच्या हातात काहीतरी भलतंच लागलं आहे. अनेकदा आपण असं पाहतो की मासे पकडायला गेलेल्या मच्छिमारांना भलतेच काहीतरी सापडत असते. कधी त्यांना कुठल्यातरी भलत्याच गोष्टी सापडतात तर कधी त्यांच्या हातात मोठी खजिनाच लागतो.
तर अनेकदा असं होतं की त्यांच्या हाताला काहीतरी असे लागते ज्याची किंमत किंवा त्या वस्तूचे महत्त्व फार चांगले असते परंतु त्याचे तेच महत्त्व पटकन समजून येत नाही. तेव्हा चला तर मग पाहुया की यावेळी या मच्छिमाराच्या हाती असं काय बरं लागलेलं आहे. अमेरिकेच्या कंसास येथे राहणारा एक व्यक्ती चेनी झील येथे मासेमारीसाठी गेला होता. त्याच्या हाताला खूप मोठा मासा लागलाही परंतु त्याच्यासोबतच त्याच्या जाळ्यात एक मोठी वस्तूही आली. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु त्याला पाण्याच्या खाली असलेली एक जीप सापडली.
जॉन माऊंन्स यांनी याबाबतची माहिती दिली आहे. फॉक्स 6 च्या रिपोर्टनुसार ते म्हणाले की, मी आजूबाजूला मासे शोधत होतो. तेव्हाच मला कळाले की पाण्यातून काहीतरी मोठी गोष्टी वर येताना दिसते आहे. तेवढ्यात मी माझं सगळं काही बाजूला ठेवलं आणि ती गोष्ट काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न सुरू केला. याची चाचपणी केल्यानंतर समजले की ही जीप 1990 च्या काळातील आहे. आपल्याला ही जीप मिळाल्याचा त्यांनी आनंदही व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या हा फोटो सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. समोर आलेल्या माहितीनुसार असेही समजते की ही गाडी चोरीला गेली होती.
जॉन माऊंस यांनी त्या 1990 साली चोरी झालेल्या आणि मासे पकडताना सापडलेल्या जीपचा फोटो शेअर केला आहे. (Credit: John Mounce)
मासेमारी करायला गेलेल्यांसाठी अशी वस्तू हाताला लागणं हे काही नवीन नाही. याआधीही अशा पर्याय घटना घडल्या आहेत.
भारतातही अशा अनेक घडना समोर आल्या आहेत. समुद्राच्या पाण्यात काय कोण जाणे अशीच किती रहस्य लपली असतील.