Salman Khan Health : अभिनेता सलमान खान (Salman Khan) च्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. त्यामुळे भाईजानच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्यांच्या चाहत्यांपर्यंत काही क्षणात पोहोचते. (salman khan latest news) काही दिवसांपूर्वा सलमानला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे अभिनेत्याचे चाहते प्रचंड चिंतेत होते. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबाबत वाईट बातमी मिळाल्यामुळे चाहत्यांना प्रचंड वाईट देखील वाटलं. पण आता सलमानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. (What happened to Salman Khan health?)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान नुकताच एका कार्यक्रमात दिसला. अभिनेत्याची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सलमानची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान खान नुकताच एका वाढदिवसाच्या पार्टीत दिसला. (Is Salman Khan suffering from dengue?)


सलमान खानची तब्येत बरी असल्याचे पाहून चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सलमानची प्रकृती उत्तम असल्याचं दिसत आहे. (salman khan fans)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सलमान मंगळवारी मेहुणा आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित होता. नेहमीप्रमाणेच सलमानला पाहून चाहते आनंदित झाले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार, सलमानला गेल्या आठवड्यात डेंग्यू झाला होता. 


गेल्या आठवड्यात एका सूत्राने मीडियाला सांगितले की, सलमानची तब्येत बरी नाही आणि त्याने कामामधून थोडा ब्रेक घेतला आहे. तथापि, डेंग्यूमधून सलमान बरा झाल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. (salman khan health condition)