मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीची सगळ्यात सुंदर अभिनेत्री मधुबाला यांना त्यांच्या सौंदर्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील Venus of Indian cinema असं म्हटलं जातं.  मधुबाला यांचा फिल्मी दुनियेतील प्रवास खूपच छोटा होता. 23 फेब्रुवारी 1969 रोजी वयाच्या 36 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मधुबाला हे हिंदी चित्रपटसृष्टीचं असं नाव आहे की, त्यांचा उल्लेख करताच तो सुंदर चेहरा डोळ्यांसमोर फिरतो, असं सौंदर्य एकदा दिसलं की मनातून काढणं कठीण. त्यांच्या सौंदर्याचा डंका जगभर वाजत होता. त्या 11 भावंडांमध्ये पाचव्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचवेळी मधुबाला यांची ९६ वर्षांची बहीण कनिज बलसारा यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका वृत्तानुसार, कनिज बलसारा ऑकलंडहून मुंबईत कोणत्याही आधार आणि पैशाशिवाय आल्या आहेत. कनिज बलसारा यांना त्यांची सून समिना हिने विमानात बसवलं. कनिज 29 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता मुंबईत उतरल्या. मुंबईतील वांद्रे भागात राहणारी कनिज यांची मुलगी परवेज हिला समिना नव्हे, तर चुलत भावाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली.


मधुबाला यांची भाची परवेझने एका वृत्ताला सांगितलं की, 'कनिज 17-18 वर्षांपूर्वी तिच्या मुलासोबत न्यूझीलंडला गेल्या होत्या. कारण ती तिचा मुलगा फारुक याच्यावर इतकं प्रेम करत होत्या की, त्या त्याच्याशिवाय राहू शकत नव्हत्या. माझ्या भावाचंही आईवर खूप प्रेम होतं. आमच्या पालकांना तो न्यूझीलंडला घेऊन गेला जेव्हा ते तिथे गेले. तेव्हा ती न्यूझीलंडमध्ये सुधारणा विभागात काम करत होती, पण माझी वहिनी समिना आमच्या आई-वडिलांना त्रास देत होती.


ती पुढे म्हणाली, 'तिने माझ्या आई-वडिलांसाठी घरी कधीही जेवण बनवलं नाही. माझा भाऊ फारुकला जवळच्या रेस्टॉरंटमधून आई आणि बाबांसाठी जेवण मागवायचा. समीनाची मुलगी आता ऑस्ट्रेलियात सेटल आहे, पण तिनेही माझ्या आईला वाईट वागणूक दिली. या वर्षी ८ जानेवारी रोजी भावाच्या मृत्यूनंतर समीनाने आईचा खूपच छळ केला असावा. कल्पना करा की, माझा भाऊ आम्हाला सोडून एक महिनाही झाला नाही.' त्याचबरोबर, मधुबालाची धाकटी बहीण मधुर भूषण हिने  एका वृत्ताला सांगितलं की, 'माझ्या बहिणीला अशी वागणूक मिळाल्याने मला धक्का बसला आहे.'