Holi Songs 2023 : मार्च महिना सुरु झाला आहे आणि सगळ्यांना उस्तुकता लागली आहे ती म्हणजे होळीची... रंगपंचमी हा सण 8 मार्च रोजी आहे. हा असा एकमेव सण आहे जेव्हा सगळे एकत्र येऊन याचा आनंद घेतात. सगळ्यांना हा रंगाचा सण आणि त्याचे सौंदर्य माहित आहे. रंगपंचमीला येणाऱ्या आनंदात बॉलिवूडचा देखील वाटा आहे. रंगपंचमीवर असलेली धमाल गाणी आपण नेहमी ऐकतोच. या सगळ्यात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन ते अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा या कलाकारांच्या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. लॉक डाऊन आधी अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा वॉर (War) 2019 हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील 'जय जय शिवशंकर' (Jai Jai Shivshankar)  या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या होळीत सगळीकडे आपण हे गाणं नक्कीच ऐकलं. आता देखील जर तुम्ही होळीचा प्लॅन करत असाल हे तुमच्या प्ले लिस्टमध्ये हे गाणं घेण्यास विसरू नका... 


हेही वाचा : '10 रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर से*सी; स्टेजवरच Shraddha Kapoor झाली शॉक



2. 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'बलम पिचकारी' हे गाणं तर कोणीही विसरू शकत नाही. हे गाणं अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्यावर कोरिओग्राफ करण्यात आलं आहे. या गाण्यानं आताच्या सगळ्या मुलांना वेड लावलं आहे. या गाण्याला संगीत बद्ध प्रितमनं केलं आहे. तर हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे. विशाल ददलानी आणि शालमली खोलगडे यांनी गायली आहेत. 



3. यश चोप्रा यांच्या सिलसिला या चित्रपटातील आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा आणि संजीव कपूर होते. या गाण्याचे बोल अमिताभ बच्चन यांचे वडील आणि दिग्गज कवी हरिवंशराय बच्चन यांनी लिहिले होते. 



4. 'टॉयलेट :  एक प्रेम कहानी' (Toilet : Ek Prem Kahani) या चित्रपटातील 'लठ्ठ मार' हे गाणं आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. या गाण्यानं आता होळी अधूरी आहे असं म्हणायला हरकत नाही. हे गाणं सोनू निगम आणि पलक मुच्छाल यांनी गायले आहे. 



5. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) , हेमा मालिनी (Hema Malini), परेश रावल, लिलेट दुबे यांच्या बाघबान या चित्रपटातील होरी खेले रघुवीरा हे गाणं तर आजही प्रेक्षकांच्या तोंडी राहिलेलं आहे. हे आयकॉनिक गाणं दिवंगत आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्द केलं आहे. तर गाण्याचे बोल हे समीर यांनी लिहिले आहेत. या गाण्यात प्रभू रामचंद्र यांची कहाणी सांगितले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन रवी चोप्रा हे करायला लागले आहेत. 



6. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या 'जॉली एलएलबी 2' (Jolly LLB 2) या चित्रपटातील गो पागल हे गाणं तर प्रेक्षकांच्या होळी स्पेशल लिस्टमध्ये आहेच.



तर ही गाणी नक्कीच तुमच्या प्ले लिस्टमध्ये अॅड करा आणि होळीची मज्जा घ्या