मुंबई : हॅलोविन (Halloween) निमित्त सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वंच विचित्र पोषाख घालून रस्त्यावर उतरत आहे. अशाप्रकारे हटके पोषाख करून हॅलोविन साजरे होत आहे. त्यात आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने हॅलोविन (Halloween look) निमित्त हटके लूक केला आहे. या तिच्या हटके लुकची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  


हटके लुकची चर्चा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅलोविन निमित्त (Halloween look) अनेक सेलिब्रिटी चर्चेत राहण्यासाठी हटके लुक करत आहेत. अशाच एका प्रसिद्ध मॉडेल आणि सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो होस्टने हेडी क्लमने (Heidi Klum) देखील हटके लुक केला आहे. या तिच्या लुकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत ती एका गांडूळाच्या पोषाखात दिसत आहे. हा तिचा पोशाख अनेकांना किळसवाना वाटत आहे. त्यामुळे काही लोक तिच्या या लुकची दादही देत आहेत, तर काही तिला ट्रोल देखील करत आहेत. 


गांडूळाचा पोषाख परिधान


हेडी क्लमने (Heidi Klum Halloween Costume) यंदाच्या वर्षा हॅलोविननिमित्त गांडूळाचा पोषाख घातला होता. या पोशाखाला रिअॅलिस्टिक लूक देण्यासाठी तिने चेहऱ्यावर त्याच कलरचा मेकअप देखील केला होता. या पोषाखात मॉडेलने स्वतःला डोक्यापासून पायापर्यंत झाकले होते. एवढच नाही तर लुक आणखीण रिअॅलिस्टिक वाटण्यासाठी तिने मेकअपच्या माध्यमातून चेहऱ्यावर तशाच प्रकारचे थर लावले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Heidi Klum (@heidiklum)


दरम्यान हेडी (Heidi Klum) सोबत तिचा नवरा टॉम कौलिट्झही दिसला.या थीम कॉस्च्युममध्ये तो तिच्यावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका साकारताना दिसला. टॉमने सुद्धा खूप भयानक मेकअप केला होता. सध्या या दोघांच्या हॅलोवीन (Halloween) स्टाईलची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.