ऐश्वर्याने हृतिकच्या Lipkiss मुळे अभिषेक बच्चन नाराज; दिली अशी प्रतिक्रिया
ऐश्वर्याने किसिंग सीन दिल्यामुळे अभिनेत्रीला लीगल नेटीस देखील पाठवण्यात आली.
मुंबई : सौंदर्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्याला आज प्रत्येक जण ओळखतो. सौंदर्याने अनेकांवर भूरळ घालणाऱ्या ऐश्वर्याने पहिल्यापासून अपयशाचा सामना केला आहे. बॉलिवूडमध्ये ऐश्वर्याचे अनेक सिनेमे अपयशी ठरले. विश्वसुंदरीचा एखादा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला असेल. पण बॉलिवूडमध्ये करियर करत असताना ऐश्वर्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. एका सिनेमात ऐश्वर्याने किसिंग सीन दिल्यामुळे अभिनेत्रीला लीगल नेटीस देखील पाठवण्यात आली.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. तिच्या सौंदर्याच्या किस्से असोत किंवा तिच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतेच. ऐश्वर्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत ज्यांच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर या अभिनेत्रीने बॉलिवूडवर राज्य केलं आहे.
अभिषेक बच्चनसोबत लग्न केल्यानंतर ऐश्वर्याने काही काळ ब्रेक घेतला आणि त्यानंतर तिने पुन्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला. ऐश्वर्या ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने सर्व प्रकारची पात्रं खूप छान प्रकारे साकारली आहेत. मग ते पात्र गर्लफ्रेंडचं असो वा निरागस मुलीचं किंवा मग बोल्ड सीन्स असलेली हॉट मुलगी असो. अनेकवेळा अभिनेत्री पात्रांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांची लिपलॉक
आम्ही तुम्हाला सांगतो की, एक काळ असा होता जेव्हा हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या लिपलॉकवरून बरीच खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या रायने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. ऐश्वर्या राय वादांपासून दूर असली तरी अनेकदा ती वादात सापडली आहे.
अभिषेकही ऐश्वर्यावर झाला होता नाराज
जोधा अकबर, मोहब्बतें, धूम-२ असे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या ऐश्वर्यावर अशी वेळ आली की सगळे तिला ट्रोल करु लागले. धूम 2 मध्ये ऐश्वर्याने हृतिकसोबत लिपलॉक केलं होतं, त्यानंतर अनेक चाहत्यांनी तिला मॅसेज करून लिहिलं होतं की, आम्ही तुला आमचा आदर्श मानायचो आणि तू असं करशील आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. त्याचबरोबर या बोल्ड सीनमुळे अभिषेकलाही ऐश्वर्याचा राग आला. त्यानंतर तो हृतिक रोशनशी कधीच बोलला नाही. एवढंच नव्हेतर या सीनमुळे तिला लीगल नोटीसही पाठवण्यात आली होती.